spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

छत्रपती संभाजीनगर नामांतराच्या विरोधात इम्तियाज जलील यांचे आंदोलन

छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरून वातावरण आता अधिकच तापले आहे . एकीकडून नामांतराच्या मुद्द्याला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे .

छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराच्या मुद्द्यावरून वातावरण आता अधिकच तापले आहे . एकीकडून नामांतराच्या मुद्द्याला अनेक राजकीय पक्षांचा पाठिंबा आहे . तर दुसरीकडे आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ह्या प्रकरणाला विरोध केला आहे. त्यांनी औरंगाबाचे नाव बदलून छत्रपतीं संभाजीनगर करण्याला विरोध करत साखळी उपोषण सुरु केल आहे . आता ह्या मुद्द्यावरून छत्रपती संभाजीनगरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. इम्तियाज जलील ह्यांच्या ह्या उपोषणाला विरोध करण्यासाठी मनसे च्या कार्यकर्त्यांनी स्वाक्षरी मोहीम राबवली आहे.

 

छत्रपती संभाजी नगर नामांतराच्या मुद्यावरून एम आय एम आणि मनसे एकमेकांच्या विरोधारात पुन्हा उभे राहिलेले दिसून आले . संभाजीनगरच्या नामांतराच्या विरोधात इम्तीयाज जलील ह्यांनी शनिवार पासून जिल्हाधीकारी कार्यालयासमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यावेळी शेकडो नागरिकांनी ह्या उपोषणाला पाठिंबा देखील दिला आहे. परंतु मनसेने ह्या आंदोलनाच्या विरोधात पाऊलं उचलत स्वाक्षरी आंदोलन चालू केले हि मोहीम मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर ह्यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील टीव्ही सेंटर भागात राबवली जात आहे.

आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे,इम्तियाज जलील ह्यांचा आरोप –एम आय एम च्या आंदोलनामुळे वातावरण तापलेल असतानाच नवीन मुद्दा समोर आला आहे. आंदोलनामध्ये एक तरुण आपल्या हातात औरंगजेबाचा  बोर्ड घेऊन उभा होता त्याला बघून हळू हळू लोकांची देखील गर्दी तिथे व्हायला लागली लोकांनी जिंदाबाद जिंदाबाद औरंगजेब जिंदाबाद आशा घोषणा द्यायला सुरुवात केली त्यामुळे हे आंदोलन चिघळण्याची वेळ आली ह्याचा विडिओ देखील व्हायरल झाला . परंतु एम आय एम चे खासदार आणि ह्या आंदोलनाचे प्रमुख इम्तियाज जलील ह्यांनी हा तरुण एम आय एम चा नाही असे स्पष्टीकरण देत आमच्या आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप केला आहे.

हे ही वाचा :

मोठी बातमी ! मनसे नेते संदीप देशपांडेवर मॉर्निंग वॉकवेळी हल्ला, जाणून घ्या हेल्थ अपडेट

Women’s Premier League, पहिला सलामी सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात जायंट्स

ठामपाच्यावतीने गरजू महिलांसाठी ‘धर्मवीर आनंद दिघे स्वयंरोजगार योजना’ सुरू करावी शिवसेनेची मागणी

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss