छगन भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी: मनोज जरांगेंची मागणी

मराठा आंदोलक मनोज जरांगे आज नाशिक दौरा करत आहेत.

छगन भुजबळांनी नाभिक समाजाची माफी मागावी: मनोज जरांगेंची मागणी

मराठा आंदोलक मनोज जरांगे आज नाशिक दौरा करत आहेत. आज ते नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव तालुक्याचा दौरा करणार आहेत. तसेच ते साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शनसुद्धा घेणार आहेत. या दौऱ्या दरम्यान मनोज जरांगे यांचे मराठा समजाकडून ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत केले जात आहे. त्यांचे सगळीकडे जोरदार शक्तीप्रदर्शन चालू आहे. त्यामुळे आज मनोज जरांगे करत असलेला नाशिक दौरा चांगलाच चर्चेत आहे.

मराठा आरक्षण हा मुद्दा मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. या आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी असा वाद पेटला आहे. मनोज जरांगे विरुद्ध छगन भुजबळ असे देखील पाहायला मिळत आहे. मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य केल्यानंतर छगन भुजबळ यांनी काढण्यात आलेल्या अध्यादेशाला विरोध केला आहे. त्यातच मनोज जरांगे यांनी नाशिक दौऱ्या दरम्यान छगन भुजबळांवर जोरदार टीका केली आहे. मनोज जरांगे म्हणाले, छगन भुजबळ जर ओबीसी समाजाचे नेते असतील तर त्यांनी नाभिक समाजाची माफी मागावी. त्यांनी त्यांचा अपमान केला आहे. माफी मागितली नाही, तर त्याचा अर्थ असा होतो जाणूनबुजून अपमान केला, असे म्हणत जरांगेंनी भुजबळांवर निशाणा साधला आहे. ओबीसी समाजाने भुजबळ यांना समज द्यावी, असे देखील जरांगे म्हणाले.

दरम्यान, पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, कोणत्या नेत्याचा बालेकिल्ला नसतो, तो जनतेचा असतो. मराठा क्रांती मोर्चाचे नेते आज भुजबळांच्या राजीनाम्यासाठी राज्यपालांना भेटणार आहेत. भुजबळ राजीनामा देणार नाही. ते घ्यायला बसले आहेत. भुजबळांनी राजीनामा द्यावा अथवा नाही त्यात मी पडणार नाही. मी इतक्या खालच्या दर्जाला जाणार नाही. छगन भुजबळ यांनी नाभिक समाजाची माफी मागावी. ओबीसी समाजाचा नेता असेल तर माफी मागावी. ते सुद्धा गोरगरिब आहेत. त्यांनी त्यांचा अपमान केलाय. त्यांची माफी मागावी. माफी मागितली नाही, त्याचा अर्थ असा होतो जाणूनबुजून अपमान केला. माफी मागणार नाही, असे म्हणत मनोज जरांगे यांनी भुजबळांवर टीका केली आहे.

हे ही वाचा: 

Mumbai Congress पक्षात राजकीय भूकंप, अजून एका नेत्याचा राजीनामा

RBI ने दिला सर्वसामान्य नागरिकांना दिलासा, रेपो दर जैसे थे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version