हिंसाराच्या घटनेनंतर छत्रपती संभाजी नगर पोलीस अलर्ट

आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्यामुळे कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी आज आक्रमक झाले आहेत. या प्रकरणामुळे कोल्हापूरमध्ये आज काही संघटना रस्त्यावर आहेत.

हिंसाराच्या घटनेनंतर छत्रपती संभाजी नगर पोलीस अलर्ट

आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्यामुळे कोल्हापूरमध्ये आज हिंदुत्ववादी आज आक्रमक झाले आहेत. या प्रकरणामुळे कोल्हापूरमध्ये आज काही संघटना रस्त्यावर आहेत. त्यामुळे आज कोल्हापूरमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले आहे. त्यामुळे आज कोल्हापूरमधील हिंसाचाराची परिस्थिती पाहता छत्रपती संभाजी नगर पोलीस अलर्ट मोडवर आहेत. जिल्यातील सर्वच पोलीस ठाणे प्रमुखांना पेट्रोलिंग वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच सोशल मीडियावर जास्त लक्ष देण्याच्या सूचना वरिष्ठां अधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत.

हिंसाचाराच्या घटनेनंतर कोल्हापूरमध्ये त्याचे पडसाद उमटू नये याची खबरदारी घेण्यात आली आहे. ग्रामीण पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया यांनी सर्वच ठाणेप्रमुखांना ग्रुप कॉलिंगवर विशेष सूचना दिल्या आहेत आणि त्या सूचनांचे पालन करण्यात यावे असे आदेश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पोलीस ठाणे हद्दीत विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर जिल्यामध्ये काही विशिष्ट समाजातील तरुणांनी काल औरंगजेब आणि टिपू सुलतानचे स्टेटस सोशल मीडियावर ठेवले होते. एका गटाने एका विशिष्ट समाजाच्या वस्तीवर दगडफेक करण्यात आली होती. बऱ्याच भागांमध्ये दगडफेक करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळेच पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. हे सर्व रोखण्यासाठी शहरातील इंटरनेट बंद करण्यात शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

नवी मुंबईत घ्या Tirupati Balajiचं दर्शन, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं मंदिराचं भूमिपूजन

बारावीनंतर नाही तर दहावीनंतर करता येतील हे Diploma; जाणून घ्या सविस्तर

डाळ भात खाऊन आलाय कंटाळा ? मग बनवा घरच्या घरी हॉटेल स्टाईल Dal Khichadi

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version