spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

शिवप्रताप दिनानिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार उपस्थित

किल्ले प्रतापगड (Fort Pratapgad) येथे शिवप्रतापदिनाच्या (Shiv Pratap Day) कार्यक्रमाला आजपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. शिवप्रतापदिनासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आज उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्यावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी (shower of flowers from a helicopter) करण्यात येणार आहे. शिवप्रताप दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. काही वेळातच मुख्यमंत्री शिंदे हे प्रतापगड येथे पोहोचणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रतापगडावरील मुख्य बुरुजावर ध्वजारोहण (flag hoisting) करण्यात येणार आहे.

किल्ले प्रतापगडावर आज ३६५वा शिवप्रताप दिन आहे. या शिवप्रताप दिनाच्या सोहळ्या निमित्त प्रताप गड सजला आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत. खासदार उदयनराजे भोसलेही यांनाही या सोहळ्याचं निमंत्रण आहे. मात्र, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला. त्यामुळे उदयनराजे यांनी कठोर भूमिका घेतली आहे. त्यातच राज्य सरकारने राज्यपालांचा साधा निषेधही न नोंदवल्याने उदयनराजे भोसले या सोहळ्याला उपस्थित न राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

किल्ले प्रतापगडावर ग्रामस्थ आणि जिल्हा प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आणि झेंड्याचे पूजन केलं. संपूर्ण प्रतापगड भगव्या झेंड्यांनी सजवण्यात आला आहे. तसेच गडावर विद्यूत रोषणाईही करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण गड परिसर भगवामय झाला आहे. तर पालखीच्या भोईंनी शिवकालीन पोषाख करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष करून संपूर्ण परिसर दणाणून सोडला आहे. प्रतापगडावर छत्रपतींना मानवंदना देण्यासाठी उंब्रजवरून असंख्य सायकल स्वार आले आहेत. सायकलस्वारांनी इथे तयार केलेल्या रस्त्यांची केली स्तुती केली आहे. छत्रपती शिवराय त्या काळात गड कशा पद्धतीने सर करत असावेत? त्यांचं अश्वधन गडावर कसं जात असावं? याचा सायकलवरून जाऊन तरुणांनी अनुभव घेतला. शिवप्रताप दिन हा आमच्या जिवाभावाचा विषय आहे, अशी प्रतिक्रिया या सायकलस्वार तरुणांनी दिली आहे.

हे ही वाचा : 

टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

नवाब मलिकांच्या जमीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी

Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss