spot_img
Sunday, September 22, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुख्यमंत्री झाले शेतकरी! पत्नीसह केली फळांची लागवड…

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नीसोबत शेती केल्याची बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान ठाणे असले तरी त्यांचे मूळ गाव सातारा आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे या गावी गेले आहेत

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नीसोबत शेती केल्याची बातमी समोर येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान ठाणे असले तरी त्यांचे मूळ गाव सातारा आहे. सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरे या गावी गेले आहेत. गावाला जाऊन त्यांनाही त्यांच्या पत्नीसोबत शेती केल्याचे दिसून येते. एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पत्नीसह आपल्या शेतात केळीची लागवड केली आहे. मुख्यमंत्रांनी पाच हजार केळीच्या झाडाची लागवड केली आहे. केळीसोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नारळाच्या झाडाची देखील लागवड केली आहे. तसेच शेती करण्याची आवड असल्याची गोष्ट खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितली. तसेच मी प्रत्येकवेळी गावी आलो की झाडे वाढवतो असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्रांसोबतच त्यांच्या पत्नी देखील शेती करताना दिसून आल्या. शेती करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पत्नी लता शिंदे यादेखील उपस्थित होत्या. लता शिंदे याबद्दल सांगताना म्हणाल्या,” मला शेतीची आवड आहे. मी नेहमी शेताकडे येत असते. गेल्या वेळेस हळदीच्या झाडांची लागवड केली होती. यावेळेस केळीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. माझ्या मुलाला तसेच साहेबांना देखील शेतीची आवड असल्याची माहिती लता शिंदे यांनी दिली”.

महाराष्ट्रातील कोयना धरण अस्वच्छ झाले आहे. या कोयना धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला आहे. हा गाळ काढून कोयना धरण स्वच्छ करण्यासाठी नाम फाउंडेशन (Naam Foundation) ने पुढाकार घेऊन संपूर्ण जबाबदारी हाती घेतली आहे. तसेच या शुभकार्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते केली. यावेळी या कामाचा शुभारंभ एकनाथ शिंदे यांच्या हातून पार पडण्यात आला. यावेळी त्यांनी कोयना धरणाची पाहणी केली. गाळमुक्त धारण तसेच गाळयुक्त शेती करण्याचे धोरण मुख्यमंत्र्यांनी हाती घेतले आहे असे ते म्हणाले. धरणातील साचलेला गाळ हा शेतीसाठी उपयुक्त ठरतो असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच अनेक ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या समस्या सांगितल्या. आणि मुख्यमंत्र्यानी अनेक ग्रामस्थांच्या समस्यांची दखल घेतली. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांची माहिती मुख्यमंत्र्यानी घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यानी गाळमुक्त धोरण या योजने द्वारे धरणातील गाळ उचलण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील सोळशी धरणाचा सर्वेक्षण आराखडा वेगाने पूर्ण करण्याचेही आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले.

मुख्यमंत्री हे मूळचे सातारा जिल्ह्याचे आहेत. एकनाथ शिंदे यांनी दरे या गावी शेती आहे. दरे हे गाव साताऱ्या जिल्ह्यातील खंबाटकी खोऱ्यातील तसेच कोयना धरणाच्या तीरावर वसलेले एक गाव आहे. मुख्यमंत्री यांनी त्यांच्या शेतात आंबा, चिकू, स्ट्रॉबेरी, सफरचंद, नारळ, आणि केळी या विविध फळांची लागवड केली आहे. मुख्यमंत्र्याना शेतीची भरपूर आवड आहे. त्यांना वेळ मिळाला की ते गावी जाऊन शेतीत रमतात. मुख्यमंत्र्यानी आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीतकडे चांगलेच लक्ष देऊन त्यांनी आपली शेती चांगल्या पद्धतीने विकसीत केली आहे.

हे ही वाचा:

Titanic Submarine, बेपत्ता पाणबुडी अखेर सापडली! परंतु अवशेष पाहायला गेलेल्या ५ ही जणांचा मृत्यू…

पंतप्रधान नरेंद्र मोदींची US भेट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss