spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

राज्यातील चंद्रपूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यात चक्क सोन्याची खाणी, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर शोधमोहीम सुरु

महाराष्ट्र राज्यातील दोन जिल्ह्यांमध्ये (Chandrapur and Sindhudurg districts) सोन्याच्या खाणी असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती दिली. ते मुंबईतील (Mumbai) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याबाबतच्या माहितीला दुजोरा दिला. राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आर्यन या खनिजांसोबत सोनंही असू शकतं, असं आता बोललं जातंय. याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचंही सांगितलं जातंय. या दृष्टीने आता चाचणीही सुरु करण्यात आल्याचं कळतंय.

हेही वाचा : 

मुंबै बँक घोटाळा प्रकरणी, प्रवीण दरेकरांना आर्थिक गुन्हे शाखेकडून क्लीन चीट

राज्यात सोन्याचे दोन ब्लॉक असल्याची माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी आपल्याला दिली आहे. आमच्या काळात हे सोने निघाले तर ती राज्यासाठी खूप मोठी उपलब्धी असेल. राज्यात खनिकर्म क्षेत्राला मोठा वाव असून गडचिरोलीसारख्या दुर्गम भागात देशातील सर्वात मोठा स्टील प्रकल्प सुरू करू शकतो, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

Vijay Hazare Trophy सौराष्ट्रानं नाणेफेक जिंकलं, महाराष्ट्राची फलंदाजी सुरू

दरम्यान, चंद्रपूर येथील गोंडपिपरी तालुक्याच्या भूगर्भात मौल्यवान (Gold Mines in Maharashtra) प्लॅटिनम, सोने आणि दुर्मिळात दुर्मिळ म्हणून ओळखले जाणारे रूथेनियम, रेडिअम, इरेडिअम धातू असल्याचं दहा वर्षांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून समोर आलं आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण विभागाच्या शास्त्रज्ञांनी तालुक्यात २००७ ते २०१० मध्ये करण्यात आलेल्या सर्व्हेत हे उघड झालं होते.

राज्यात गोवर रुग्णांच्या प्रादुर्भावात झपाट्याने वाढ, औरंगाबादमध्ये 7 नवे रुग्ण, तर संशयितांचा आकडा ८० वर

Latest Posts

Don't Miss