मुख्यमंत्री आजपासून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी संभाजीनगर दौऱ्यावर

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) आज मंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री आजपासून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी संभाजीनगर दौऱ्यावर

छत्रपती संभाजीनगरमध्ये (Chhatrapati Sambhajinagar) आज मंत्री मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज संभाजी नगरमध्ये असणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवस मुक्काम करणार आहेत. मुख्यमंत्री आज दिवसभर मंत्रिमंडळ आणि विविध विकास कामांच्या उद्घाटनाला हजेरी लावणार आहेत. उद्या (१७ सप्टेंबर) मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीकडे जाणार आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सकाळी ८ वाजून ४५ मिनीटांनी मुख्यमंत्र्यांचे औरंगाबाद विमानतळ येथे आगमन होणार आहे. त्यानंतर मोटारीनं जिल्हाधिकारी कार्यालय, औरंगाबादकडे ते जाणार आहेत. त्यानंतर सकाळी ९ वाजता औरंगाबाद शहरातील विविध प्रकल्प इमारतींचे ऑनलाईन भूमीपुजन / लोकार्पण कार्यक्रम – जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचे ई भूमीपुजन, सातारा व देवळाई परिसरातील मलनि:स्सारण योजनांचे ई भूमीपुजन,
महसूल येथील घनकचरा प्रक्रिया केंद्राचे ई लोकार्पण. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कॉफी टेबल बुक, गॅझेटियर, डॉक्युड्रामा फिल्म व पोस्टल कव्हर विमोचन, औरंगाबाद जिल्ह्याच्या भविष्यातील वाटचाल व प्रगतीबाबत मंथन बैठक,
स्थळ:- वंदे मातरम सभागृह.
लोकार्पण कार्यक्रम पार पडल्यानंतर सकाळी १०. ४० वाजता मोटारीने स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबादकडे जातील. नंतर ते सकाळी १०. ४० वाजता स्मार्ट सिटी कार्यालय, औरंगाबाद येथे त्यांचे आगमन होणार आहे. त्यानंतर ते सकाळी १०. ५० वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास माल्यार्पण स्थळ: स्मार्ट सिटी कार्यालय. सकाळी १०. ५५ वाजता छत्रपती संभाजीनगर जिल्हा / विभाग / तालुका नामकरण बोर्डाचे अनावरण. स्थळ: स्मार्ट सिटी कार्यालय.
दुपारी ११ वा.राज्य मंत्रीमंडळ बैठक.स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय. मंत्रीमंडळ
बैठकीनंतर लातूर येथील शासकीय निवासी शाळेच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन, स्थळ:- स्मार्ट सिटी कार्यालय. दुपारी २ वाजता पत्रकार परिषद स्थळ :- अण्णाभाऊ साठे रिसर्च सेंटर, स्मार्ट सिटी कार्यालय जवळ. दुपारी ३ वाजता मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.
दुपारी ३. १५ वा.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन व राखीव. सायं. ५ वा. मोटारीने गॅलॅक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, अग्नीहोत्र चौक, ज्योतीनगर,औरंगाबादकडे जाणार.
सायं. ५. १५ वा.गॅलॅक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे उद्घाटन.
स्थळ:- चेतक घोडा जवळ, अग्नीहोत्र चौक, ज्योतीनगर, औरंगाबाद.
सायं. ५. ३० वा.मोटारीने निराला बाजार, औरंगाबादकडे जाणार
सायं. ५. ४० वा.गणेश महासंघ कार्यालयाचे उद्घाटन.
स्थळ:- निराला बाजार, औरंगाबाद.
सायं. ५. ५० वा.मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे जाणार
सायं. ६ वा.शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
रात्री ८.२० वा.मोटारीने क्रांती चौक, औरंगाबादकडे जाणार
रात्री ८. ३० वा.’गर्जा मराठवाडा’ कार्यक्रमास उपस्थिती.स्थळ:- क्रांती चौक, औरंगाबाद.
सोयीनुसार मोटारीने शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे प्रयाण.शासकीय विश्रामगृह, औरंगाबाद येथे आगमन, राखीव व मुक्काम.

रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी ८. ४५ मिनिटांनी सिध्दार्थ उद्यान, औरंगाबादकडे जाणार आहेत. त्यानंतर ते ९ वाजता मराठवाडा मुक्तिसंग्राम ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रमासाठी जाणार आहेत. मराठवाडा मुक्तिसंग्राम चित्रप्रदर्शनीस भेट, ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक लाला लक्ष्मीनारायण मोहनलाल जैस्वाल यांच्या तैलचित्राचे अनावरण, शासकीय विश्रामगृह, औरंगाबादकडे जातील. हे सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर औरंगाबाद विमानतळावरून ते श्रीनगर, जम्मू-कश्मिरकडे जाणार आहे.

हे ही वाचा: 

‘नमो एक्सप्रेस’ला देवेंद्र फडणवीसांनी दाखवला भगवा झेंडा…

आजचे राशिभविष्य,१६ सप्टेंबर २०२३, ज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे.

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version