मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, राज्यात पेट्रोल-डिझेल करात कपात

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, राज्यात पेट्रोल-डिझेल करात कपात

मुंबई : देशात मागील काही दिवसांपासून पेट्रोल डिझेलचे दर मोठ्या प्रमाणात वाढल्या त्यानंतर केंद्र सरकारने हे दम कमी करण्याचा देखील निर्णय घेतला होता तसेच देशातील अनेक राज्यांमध्ये देखील इंधनावरील दरदेखील कमी करण्यात आले होते मात्र महाविकास सरकार आघाडीने या संदर्भात कोणताही निर्णय घेऊन सर्वसामान्य नागरिकांना दिलासा दिलेला नव्हता परंतु आज राज्याच्या नव्या सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय.

यामध्ये पेट्रोलवर पाच रुपये आणि डिझेलवर तीन रुपये असे दरामध्ये कपात करण्यात आलेले आहे. त्याचबरोबर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना प्रतिबंधक लसी संदर्भात नागरिकांना दिलासा दिलेला आहे. राज्यात 18 ते 59 वयोगटातील नागरिकांसाठी मोफत बूस्टर डोस देण्यात येणार आहे.

हेही वाचा : 

…तर मातोश्रीवर जाऊन त्यांची भांडी घासा निलेश राणेंचा दीपक केसरकरांना टोला

राज्यात “स्वच्छ महाराष्ट्र अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. त्याच बरोबर केंद्र सरकारचा अमृत अभियान राज्यातही राबविणार येणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. याशिवाय नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या नगराध्यक्षांची निवड थेट जनतेच्या मतांनीच घेतली जाणार आहे.

आणीबाणीच्या कालावधीत ज्या व्यक्तींना बंदिवास सोसावा लागला आहे, अशा व्यक्तींचा सन्मान करण्याची योजना 31 जुलै, 2020 रोजी बंद करण्यात आलेली योजना पुन्हा सुरु करण्याची महत्त्वाची घोषणादेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

द्रौपदी मूर्मु यांच्या मुंबई दौऱ्यात मातोश्रीवरील भेट नाही; संजय राऊत

Exit mobile version