spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

कुणबी प्रमाणपत्रबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवलीय आहे. आरक्षणाचा चेंडू त्यांनी पुन्हा सरकारच्या कोर्टात ढकललाय. दरम्यान आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक बोलावण्यात आलीय. समितीनं आत्तापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समिती सादर करणार आहे.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा चर्चेची तयारी दर्शवलीय आहे. आरक्षणाचा चेंडू त्यांनी पुन्हा सरकारच्या कोर्टात ढकललाय. दरम्यान आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक बोलावण्यात आलीय. समितीनं आत्तापर्यंत केलेल्या कामाचा अहवाल समिती सादर करणार आहे.

मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहे. ज्यांचे कुणबी असल्याचा पुरावा मिळाला आहे त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासंदर्भात मुख्यमंत्री घोषणा करण्याची शक्यता आहे. माजी न्यायमूर्ती शिंदे समितीला आतापर्यंत अनेक नोंदी आढळले आहेत ज्यांच्या नोंदी आढळल्यात त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची संदर्भात घोषणा होण्याची शक्यता आहे.

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत न्या शिंदे समितीच्या कामकाजाचा आढावा हा राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत मांडला जाणार असल्याची बैठकीतल्या सूत्रांनी माहिती दिली आहे. मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, न्या संदीप शिंदे ( निवृत्त), मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडे, विशेष निमंत्रित मंत्री दिलीप वळसे पाटील, दीपक केसरकर, समितीचे सदस्य मंत्री दादा भुसे, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, शंभूराज देसाई, उदय सामंत, आमदार प्रवीण दरेकर, योगेश कदम, भरत गोगावले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महाधिवक्ता बिरेंद्र सराफ , मुख्य सचिव मनोज सौनिक उपस्थित आहे.

बैठकीत काय होण्याची शक्यता?
सुप्रीम कोर्टात पुन्हा जाण्यासाठी गायकवाड समितीने केलेल्या शिफारशींचा पुन्हा एकदा आज आढावा होण्याची शक्यता
त्याच सोबत माजी न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीचे सर्वेक्षण याचाही होणार आज आढावा
सारथी संस्थेसह मराठा समाजाला दिल्या जाणाऱ्या उपायोजनांचाही आज आढावा घेतला जाईल
यामध्ये आणखी काही नवीन तरतुदी करण्याची शक्यता जेणेकरून मराठा समाजाचा रोष कमी होऊ शकेल
मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याचा आज पुन्हा एकदा आढावा घेतला जाणार आहे.

हे ही वाचा : 

‘बिग बॉस’च्या घरात अंकिता लोखंडे आणि विकी जैनमध्ये वाद

संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, मुख्यमंत्री भाजपची भांडी घासतात…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

 

Latest Posts

Don't Miss