माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री माणिकराव गावित यांचे निधन

महाराष्ट्रामधील दिग्गज आणि अभ्यासू राजकारण्याचा धगधगता प्रवास संपुष्टात आला. माजी केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित (Manikrao Gavit) यांचे अल्पशा आजाराने दुर्दैवी निधन झाले. नाशिकमध्ये खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. माणिकराव गावित नंदुरबारमधून (Nandurbar) सलग नऊ वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. शनिवार, १७ सप्टेंबर सकाळी ८ वाजून ५ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते कार्यकर्त्यांमध्ये ‘दादासाहेब’ म्हणून लोकप्रिय होते. माणिकराव गावित यांचे सुपुत्र भरत गावित यांनी ट्विटरवरुन वडिलांच्या निधनाची दुःखद बातमी दिली आहे.

माणिकराव गावित यांनी राजकारणाची सुरवात ही स्थानिक पातळीपासून सुरवात केली. माणिकरावांनी १९६५ मध्ये ग्रामपंचायतीपासून राजकारणाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर केंद्रीय गृह राज्यमंत्री, सामाजिक न्याय राज्यमंत्री अशी पदं न मागताच त्यांना मिळाली. संसदेतील सर्वात ज्येष्ठ खासदार म्हणून त्यांनी लोकसभेचे हंगामी अध्यक्षपदही भूषवले होते. १९८१ मध्ये त्यांनी पहिल्यांदा लोकसभा लढवली व विजयीही झाले. त्यानंतर त्यांनी सलग नऊ वर्ष विजयी टिळा मिरवला.अनेक वर्षाचा त्यांचा रजकरणातला दांडगा अभ्यास आणि लोकप्रिय असलेला नेता आज महाराष्ट्राने गमावला आहे.

अखेर भारतात ‘चित्ता’ परतला, नरेंद्र मोदींच्या हस्ते चित्ते अभयारण्यात सोडले

लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस हे एक समीकरण तयार झालं होतं. परंतु काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माणिकराव गावितांना पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०१९ मध्ये माणिक गावित यांचे सुपुत्र भरत गावित (Bharat Gavit) यांनी आपल्यासाठी लोकसभेची उमेदवारी मागितली होती. मात्र काँग्रेसने के. सी. पाडवी यांना तिकीट दिले. त्यामुळे गेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भरत गावित यांनी कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर कन्या निर्मला गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

हे ही वाचा:

भारतात ७० वर्षांनंतर चित्त्याची चाल दिसणार

नक्की काय आहे भारताचं ‘प्रोजेक्ट चित्ता’?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version