बीडमधील परळीची ओळख असलेली चिमणी जमीनदोस्त

प्रत्येक शहराची ओळख एक वेगळ्या वास्तूने होत असते. तशीच काहीशी ओळख हि परळीची देखील आहे. परळीची ओळख ही थर्मल पॉवर स्टेशनमुळे नक्कीच वेगळी आहे.

बीडमधील परळीची ओळख असलेली चिमणी जमीनदोस्त

प्रत्येक शहराची ओळख एक वेगळ्या वास्तूने होत असते. तशीच काहीशी ओळख हि परळीची देखील आहे. परळीची ओळख ही थर्मल पॉवर स्टेशनमुळे नक्कीच वेगळी आहे. हे थर्मल पावर स्टेशन जरी बंदिस्त असले तरी या थर्मल पॉवर स्टेशनमधून निघणारा जो काही धूर आहे तो बाहेर सोडण्यासाठी उंच मनोऱ्यासारख्या उभ्या असलेल्या या चिमण्या लोकांचं लक्ष वेधून घेत होत्या. या चिमण्यांपैकी एक असलेली सर्वात जुनी चिमणी आता इतिहास जमा झाली.

कोळशापासून (Coal) विद्युत निर्मिती करणारा मराठवाड्यातील एकमेव प्रकल्प असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील (Parali Thermal Power Station) ऐतिहासिक चिमणी (Chimney) आता जमीनदोस्त करण्यात आली आहे. मागच्या काही दिवसापासूनच परळी औष्णिक विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार व पाच हे बंद करण्यात आलेले आहेत. २१० मेगाव्हेट वीज निर्मितीचे हे तीन संच बंद केल्यानंतर या संचासाठी लागणारे सगळी सामग्री सुद्धा आता भंगरात काढण्याचं काम सध्या सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून परळी औष्णिक विद्युत केंद्रातील ऐतिहासिक चिमणीच्या चिमणीतून कोळशाचा धूर बाहेर काढला जायचा आणि खरंतर परळी शहराची ओळख अगदी या चिमणी वरून ओळखली जायची ती चिमणी आज जमीनदोस्त करण्यात आली आहे. इटालियन तंत्रज्ञानाचा वापर करून हे जुने विद्युत केंद्र बनवण्यात आले होते. त्याचाच सगळ्यात दर्शनीय भाग म्हणजे ही चिमणी होती जी आज इतिहास जमा होणार आहे.

परळीचे औष्णिक विद्युत केंद्र हे मराठवाड्यातील एकमेव कोषापासून विद्युत निर्मिती करणारे केंद्र आहे. १९७१ साली या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्राची स्थापना झाली. त्यावेळी धूर वाहण्यासाठी तीन चिमण्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. १९७१ पासून या तीन चिमण्या परळीच्या औष्णिक विद्युत केंद्राचे प्रतीक बनल्या होत्या. सद्यस्थितीला परळी येथे एकूण आठ संच निर्माण करण्यात आलेले आहेत. त्यापैकी संच क्रमांक एक ,दोन, तीन हे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. हे तीन संच निकामी झाल्यानंतर नवीन संच उभा करून त्यातून सध्या परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातून विद्युत निर्मिती होत आहे.

विद्युत केंद्रातील संच क्रमांक तीन चार पाच हे तीन संच २०१९ पासून बंद आहेत त्यापैकी संच क्रमांक तीन ची १२० फूट उंचीची चिमणी आज सकाळी पाडण्यात आली आहे.

हे ही वाचा :

राज ठाकरेंच्या ‘या’ सूचक विधानानंतर, युतीची चिन्ह ?

ओबीसी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती बंद करणे अन्यायकारक, ओबीसी एकीकरण समितीचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version