ऐन सणासुदीला नागरिक त्रस्त! गोकुळ दुधात दरवाढ, जाणून घ्या नवे दर

ऐन सणासुदीला नागरिक त्रस्त! गोकुळ दुधात दरवाढ, जाणून घ्या नवे दर

गोकुळ दूध दराच वाढ झाली आहे. गाय आणि म्हैशीच्या दूध खरेदी दरात गोकुळने वाढ केल्याने ही दरवाढ झाली आहे. अर्थात गोकुळच्या निर्णयामुळे दूध उत्पादकांना चांगला दिलासा मिळाला आहे. मात्र ऐन सणासुदीला ग्राहकांना दूध दरवाढीचा सामना करावा लागणार आहे. गोकुळ दूध महागल असून आतापासूनचं नवे दर लागू होणार नाही. गोकुळचं म्हशीचं दूध सरासरी २ रूपये तर गाईचं दूध सरासरी ३ रूपये महाग झालंय. गोकुळने गाय आणि म्हैस दूध खरेदी दर वाढवल्याने त्याचा थेट फटका ग्राहकांना बसणार आहे.

हेही वाचा : 

केदारनाथमध्ये खाजगी हेलिकॉप्टर दरीत कोसळले, दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू

माहितीनुसार, गोकुळ दूध उत्पादक संघाने शुक्रवारपासून ही दरवाढ केली आहे. दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर दूधाची मागणी मोठ्या प्रमाणाव वाढली आहे. त्यामुळे गोकूळनेही दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना काहीशा चढ्या दराने दूध खरेदी करावे लागत असले तरी दूध उत्पादकांना मात्र चार पैसे वाढून मिळणार आहेत.

असे असतील नवे दर

नव्या दरांप्रमाणे आता म्हशीच्या दूध खरेदी करताना प्रति लिटर २ रुपये मोजावे लागणार आहेत. तर गाईच्या दूध खरेदी करताना प्रति लिटर ३ रुपये मोजावे लागणार आहे. दरवाढीनंतर आता म्हशीला प्रति लिटर ४७. ५० पैसे तर गाईला प्रति लिटर ३५ रुपये दर मिळणार आहे. गेल्या दीड वर्षात ९ रुपयांची दूध दरवाढ नोंदवण्यात आली आहे. आतापर्यंत सहा वेळा दूध खरेदी-विक्री दरात वाढ करण्यात आली आहे.

मेट्रो ३च्या विरोधात प्रकल्पग्रस्त गिरगाव-काळबादेवी येथील रहिवाशांचे राज्य सरकार विरोधात आंदोलन

दरम्यान, अमूल डेअरीनेही काही दिवसांपूर्वीच आपल्या दूध विक्री दरात मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. प्राप्त माहितीनुसार, अमुलने प्रति लिटर २ रुपयांनी दूधाचे दर वाढवले आहेत. त्यामुळे पूर्ण क्रिमसह दुधाचा दर ६१ वरुन ६३ रुपये इतका झाला आहे. एका बाजूला वाढती महागाई आणि दुसऱ्या बाजूला जीवनावश्यक वस्तुंचे सातत्त्याने वाढणारे दर ही सर्वसामान्य ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

Exit mobile version