Tuesday, July 2, 2024

Latest Posts

“मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना” CM Eknath Shinde यांनी केल्या ‘या’ अटी रद्द

महाराष्ट्र विधानसभेत आज (मंगळवार, २ जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजने’ बद्दल काही अटी रद्द केल्याची घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” म्हणजे माता भगिनींचा आहेर आहे,” असे ते म्हणाले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत ३१ ऑगस्टपर्यंत वाढविण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करणाऱ्या महिलांना १ जुलैपासून लाभ देण्यात येईल असा महत्वपूर्ण निर्णय घेतानाच योजना सुलभ आणि सुटसुटीतपणे राबविण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले. विधानभवन समिती कक्षात झालेल्या बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, मुख्य सचिव सुजाता सौनिक आदी उपस्थित होते. या बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

आपल्या अधिकृत ‘X’ अकाउंटवारून ते म्हणाले, “आमच्या काळात ९ अधिवेशने झालीत, ७५ कॅबिनेट बैठका झाल्या. त्यात सुमारे ५५० हून अधिक निर्णय घेतले. हा एक विक्रमच आहे. घरात बसून नाही तर जनतेच्या दारात जाऊन ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविला. अर्थमंत्र्यांनी ऐतिहासिक आणि क्रांतिकारी बजेट मांडले. यामध्ये, माता भगिनींचे आयुष्य बदलवून टाकणाऱ्या योजना आणल्या. शेतकऱ्यांसाठी, युवकांसाठी, ज्येष्ठांसाठी योजना आणल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णयही लगेचच काढला. या योजनेतील पात्र महिलांना महिन्याला दीड हजार म्हणजे वर्षाला १८ हजार रुपये राज्य सरकार देणार आहे. यासाठी ४६ हजार कोटी रुपये तरतूद केली आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना म्हणजे माता-भगिनींना माहेरचा आहेर आहे.”

यावेळी त्यांनी आपल्या अधिकृत ‘X’ अकाऊंटवरून माहिती देत ते म्हणाले, “‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ घेण्यासाठी वयोमर्यादा आता ६५ वर्ष करण्यात येत असल्याची आणि पात्रता अटीतून जमिनीची अट रद्द केल्याची घोषणा आज विधानसभेत केली. जनतेचा विचार, विकास आणि विश्वास ही आमच्या वाटचालीची त्रिसूत्री असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:

Hathras Stampede : सत्संगात झाली चेंगराचेंगरी ; ७० ते ८० जणांनी गमावला जीव

PM Modi यांचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल, ‘मी काही लोकांच्या वेदना समजू शकतो’…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss