spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

CM Eknath Shinde Live: महिलांना सशक्त, सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याचं स्वप्न PM Modi यांच्याकडून साकार

जळगाव (Jalgoan) येथे आज २५ ऑगस्ट रोजी राज्यातील ‘लखपती दीदी संमेलन’ तसेच समुदाय संसाधन व्यक्तींचा सन्मान सोहळा होणार आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते देशभरातील स्वयंसहाय्यता गटांना २५०० कोटी रुपयांचा फिरता निधी व ५००० कोटींचे बँक अर्थसहाय्य वितरणाचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. ग्रामीण विकास मंत्रालय, भारत सरकार, ग्रामविकास व पंचायतराज विभाग महाराष्ट्र शासन उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानाअंतर्गत हा कार्यक्रम सुरु असून यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जनतेला संबोधित केले.

सगळे विक्रम मोडीत निघतील, इतक्या महिला आज येथे उपस्थित आहेत. सर्वांचे खूप-खूप स्वागत. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेदेखील स्वागत. जळगाव ही सोन्याची भूमी. त्यामुळे इथल्या बहिणी देखील सोन्यासारख्या जगत आहेत. पहिल्यांदाच इतक्या महिलांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले आहे. आपल्या सरकारने महिलांसाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. सशक्त, सक्षम, सजग आणि आत्मनिर्भर महिला बनवण्याचं स्वप्न नरेंद्र मोदी यांच्या साहाय्याने साकारण्यात आलं आहे. महिलांच्या जीवनात अभूतपूर्व बदल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना तसेच अन्य योजनांमुळे बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न साकार होण्याची वाटचाल सध्या सुरु आहे. ३ कोटी लखपती दीदीमध्ये महाराष्ट्रातील महिलांचा समावेश आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्राच्या दौ-यावर आले असून या दौ-यादरम्यान जळगाव येथे ११ लाख दीदींनी केलेल्या यशस्वी कामगिरीचा सन्मान म्हणून नरेंद्र मोदी मोदी त्यांचा सत्कार करणार आहेत. ज्या कष्टाळू महिलांनी स्व:बळावर वर्षाकाठी एक लाखाहून अधिक रुपये कमावले आहेत व त्यांनी त्यांच्या कुटुबांला हातभार लावत, कुंटुंबीयाना गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यात मदत करुन, समाजात एक आदर्श निर्माण केला आहे, अशा लखपती दीदींचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सन्मान करतील, अशी माहिती केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पत्रकार परिषदेत दिली होती. या कार्यक्रमात प्रधानमंत्री २५०० कोटी रुपयांचा सामुदायिक गुंतवणूक निधी आणि ५००० कोटी रुपयांचे बँक कर्ज जाहीर करणार असल्याचे चौहान यांनी सांगितले. यामुळे ४.३ लाख बचत गटांच्या ४८ लाख सदस्यांना तसेच २.३५ लाख बचत गटांच्या २५.८ लाख सदस्यांना लाभ होईल. चौहान यांनी सांगितले की, ग्रामीण विकास मंत्रालयाने यापूर्वीच १ कोटी लखपती दीदी तयार केल्या आहेत आणि आगामी ३ वर्षांत ३ कोटी लखपती दीदींना तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. या कार्यक्रमामध्ये ३४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील जिल्हा मुख्यालये आणि सीएलएफ दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून सहभागी होतील. १५ लाख नवीन लखपती दीदींची यादी राज्यनिहाय उपलब्ध असून यात महाराष्ट्रातील १,०४,५२० लखपती दीदींचा समावेश आहे.

हे ही वाचा:

“इथे बहिणींवर अत्याचार होत आहेत आणि कंस मामा राख्या बांधत फिरत आहेत”; Uddhav Thackeray यांनी विरोधकांना काढला चिमटा

“ज्याला आपण मतदारांशी प्रतारणा करणं असं म्हणतो, तीच या महाराष्ट्रात झालीय”; Raj Thackeray यांचे भाष्य

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss