Wednesday, June 26, 2024

Latest Posts

“बेगाने शादी मै अब्दुल्ला दिवाना”; Cm Eknath shinde यांचा विरोधकांना टोला

"आम्हाला वाटलं होतं की विरोधक चर्चा करतील आणि चहापानाच्या कार्यक्रमाला येतील. पण विरोधकांना चर्चाच करण्याची इच्छा नाही आहे.त्यांनी पत्र पाठवून त्यात घिसेपीटे प्रश्न टाकले आहेत."असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टीका केली. 

उद्यापासून राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्या पार्श्वभुमीवर आधी मंत्र्यांचा चहापानाचा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर आज महायुतीची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “आम्हाला वाटलं होतं की विरोधक चर्चा करतील आणि चहापानाच्या कार्यक्रमाला येतील. पण विरोधकांना चर्चाच करण्याची इच्छा नाही आहे.त्यांनी पत्र पाठवून त्यात घिसेपीटे प्रश्न टाकले आहेत.”असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी टीका केली.

“उद्यापासून आधीवेशनाला सुरुवात होत आहे. आमची सभागृहात प्रश्न उत्तराची तयारी आहे.पण विरोधकांची हिंमत नाही आहे. वस्तुस्थिती समोर आणून लोकांची दिशाभूल करण्याची आणि स्वत:ची पाठ थोपटवून घ्यायची असा त्यांचा आविर्भाव आहे. गेल्यावेळी विरोधी पक्ष गोंधळलेलं आणि आवसान गळालेलं होत मात्र यावेळी छाती भुगवून आले असतील. मोदी हटाओ, संविधान बदलणार,आरक्षण जाणार या प्रकारचं खोटं नरेटिव्ह पसरवलं. खोटं नरेटिव्ह पसरवून क्षणिक आनंद विरोधकांना मिळालं आहे. कॉंग्रेसला फक्त ९९ जागा मिळाल्या. तीन टर्म मध्ये  २४० पर्यंत पोहचण्यासाठी ४० वर्ष लागतील.”असा खोचक टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath shinde)  यांनी कॉंग्रेसला लगावला.

पुढे ते म्हणाले, “इतकं सगळं करुन काय मिळालं? मोदी पंतप्रधान झाले.मोदी जिंकले आणि विरोधक हरले.उबाठा विरुद्ध आम्ही १३ जागा लढलो आणि ७ जागा आम्हीच जिंकलो.बेगाने शादी मै अब्दुल्ला दिवाना असं विरोधक आहेत. तात्पुरता आलेली सूज आहे ती उतरेल.”असं म्हणत ठाकरेंच्या शिवसेनेवर टोला लगावला.तर सरकार स्थापनेपासून विरोधक बोलत आहेत की सरकार पडणार असंं बोलत होते पण अजित पवार आमच्यासोबत आले. देव पाण्यात ठेवले पण विरोधकांना काहीच उपयोग झाला नाही.शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम कोणी केलं हे सगळ्यांना माहित आहे. तुम्ही सगळे प्रकल्प बंद केले आणि आम्ही ते सुरु केले. अटल सेतूमध्ये दांडा घालून ठेवला.” असं ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) म्हणाले.

हे ही वाचा

VIDHAN PARISHAD ELECTION 2024: कोण ठरणार मुंबई शिक्षक मतदार संघाचे उमेदवार ?

VIDHAN PARISHAD ELECTION: मुंबई पदवीधर मतदारसंघ कोणाच्या ताब्यात येणार ? ; जाणूयात सविस्तर

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss