CM Eknath Shinde यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार, ‘बांबू घास नही खास है’ म्हणत बांबू मिशनला देणार प्राधान्य

CM Eknath Shinde यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार, ‘बांबू घास नही खास है’ म्हणत बांबू मिशनला देणार प्राधान्य

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा २०२४ चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या हस्ते हा पुरस्कार काल (बुधवार, १० जुलै) प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी बांबू उत्पादनावर भाष्य करत ‘बांबू घास नही खास है’ असे म्हणत राज्य शासनाने बांबू मिशनला प्राधान्य दिले असल्याचे सांगितले.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कृषी विकासाच्या विविध योजना आणि शाश्वत विकासासाठीच्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी माहिती देताना ते म्हणाले, “शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबविल्या आहेत आणि त्यांना कर्जमाफीसाठी सहकार्य केलं आहे. तसेच, पीक विमा योजनेत महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. लातूर जिल्ह्यात देशातील पहिला मायक्रो मिलेट क्लस्टर सुरू केला आहे आणि सिंचन प्रकल्पांद्वारे १७ लाख हेक्टर सिंचन क्षमता निर्माण करण्याचा ध्येय निश्चित केले आहे.राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचं ठरवले आहे आणि कपास व सोयाबीन शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येत आहे,” असे ते म्हणाले. राज्यातील कृषी क्षेत्रातील क्रांतिकारी निर्णयांमुळे महाराष्ट्राला सर्वोत्कृष्ट कृषी राज्याचा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये मायक्रो मिलेटचे उत्पादन वाढ, पीएम किसान सन्मान निधी दुप्पट, नॅनो-तंत्रज्ञान खतांचे वितरण, तृणधान्यांना एमएसपी, हरित पट्टा निर्माण आणि सिंचन क्षमता वाढ यांचा समावेश आहे.

राज्य शासनाने बांबू मिशनला प्राधान्य दिले असून, बांबू ही विशेष वनस्पती असल्याचे सांगत, बांबू पासून २००० प्रकारच्या वस्तू तयार याची माहिती होत असल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी दिली. ‘बांबू घास नही खास है’ असे म्हणत बांबू मुळे पर्यावरण संवर्धन आणि अन्न सुरक्षा यावरही भर दिला जात असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यावेळी म्हणाले, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाकडून हवामान बदलाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी सुमारे १० लाख हेक्टर जमिनीवर बांबूची लागवड करण्याचा घेतलेला क्रांतिकारी निर्णय कौतुकास्पद आहे.”

महाराष्ट्रातील शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यास उत्सुक आहेत आणि आम्ही प्रगतिशील शेतकऱ्यांचा सन्मान करत असतो, जेणेकरून अधिकाधिक शेतकरी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतील. बदलत्या काळानुसार आणि हवामानातील बदल पाहता, आमचा शेतकरी सदैव जागरूक आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्र कृषी क्रांतीत अग्रेसर असल्याची माहिती दिली .युनोचे सरचिटणीस अँण्टिवो गुट्रेस यांनी तापमान वाढीचे युग संपले असून, होरपळीचे युग सुरु झाल्याचे आणि तातडीच्या प्रयत्नांची गरज असल्याचे सांगितले होते. महाराष्ट्र सरकारने या आव्हानाला प्रतिसाद देत २१ लाख हेक्टरवर झाडे लावण्याचा आणि ५ टक्के बायोमास वापरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने जगातील मानव जात वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, CM Eknath Shinde यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

पायाभूत प्रकल्पांची कामे करताना नागरिकांच्या पुनर्वसनाबाबत दक्षता घेण्याचे उपमुख्यमंत्री Devendra Fadnavis यांचे आदेश

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version