राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, CM Eknath Shinde यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे.

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, CM Eknath Shinde यांनी स्वीकारला सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार

राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून यावर्षीचा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला आहे. पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा यांच्या माध्यमातून राज्याकडून घेतल्या गेलेल्या शाश्वत विकास धोरणांची दखल घेत, १५ व्या कृषी नेतृत्व समितीचा २०२४ चा प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी हा पुरस्कार राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासोबत स्वीकारला. केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंग चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या हस्ते हा पुरस्कार काल (बुधवार, १० जुलै)प्रदान करण्यात आला.

१५ व्या कृषी नेतृत्व समितीच्या २०२४ काँनक्लेव्हचे एग्रीकल्चर टुडे समूहाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश व केरळचे राज्यपाल पी. सदाशिवम यांच्या अध्यक्षतेखाली १५ व्या कृषी नेतृत्व पुरस्कार समितीने राज्यातील पर्यावरण रक्षण, अन्न सुरक्षा आणि शाश्वत विकास धोरणांची दखल दखल घेत महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम कृषी राज्य म्हणून निवड केली आहे. पुरस्कार वितरण सोहळ्यात केंद्रीय रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान, एग्रीकल्चर टुडे समूहाचे अध्यक्ष डॉ. एम.जे. खान, राज्याच्या कृषी मुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल व इतर मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार स्वीकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील कृषी विकासाच्या विविध योजना आणि शाश्वत विकासासाठीच्या प्रयत्नांची माहिती दिली. यावेळी माहिती देताना ते म्हणाले, “महाराष्ट्र हे कृषी क्रांतीचं जनक राज्य आहे. महाराष्ट्रला हरित क्रांतीची समृद्ध परंपरा आहे आणि कृषी व शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची गौरवशाली परंपरा देखील आहे. राज्याचे प्रमुख म्हणून हा पुरस्कार स्वीकारताना मला आनंद होत आहे.मी एक सामान्य शेतकरी कुटुंबातून आलो असून हा पुरस्कार स्वीकारताना मला मोठा अभिमान वाटतो. महाराष्ट्र राज्याला कृषी क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या राज्याच्या रूपात निवडल्याबद्दल ‘एग्रीकल्चर टुडे’ आणि परीक्षक मंडळाचे आभार मानत, हा पुरस्कार राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा सन्मान आहे. शेतकऱ्यांचे कष्ट, मेहनत आणि मातीच्या प्रेमाचं ही फलश्रुती आहे. आमच्या शेतकऱ्यांना ‘अन्नदाता’ म्हणून मान दिला जातो आणि राज्य सरकारने त्यांच्या हितांसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.”

हे ही वाचा:

आरक्षणाचे खरे शत्रू कोण आता मराठा समाजाने ओळखावे, मंत्री विखे पाटील

रिफायनरीला फक्त ‘तोडपाणी’ साठी विरोध करत आहेत, Narayan Rane यांचा विरोधकांना टोला

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version