spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

विविध क्षेत्रांना जोडणारा निखळ दुवा निखळला, Father Francis Dibrito यांना CM Shinde यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण

माजी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.  सामाजिक, साहित्यिक, पर्यावरण आणि अध्यात्मिक क्षेत्राला जोडणारा दुवा आणि ज्येष्ठ मार्गदर्शकाला महाराष्ट्र मुकला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपदाचा मान

मुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात की, फादर दिब्रिटो यांनी धर्मप्रांतात शांतता, बंधुभाव, एकात्मता यासाठी काम करताना पर्यावरण प्रेमाची हरित वसई चळवळ उभी केली. संत साहित्याचा गाढा अभ्यास आणि त्यातून एकोपा साधण्याचा त्यांचा प्रयत्न वैशिष्ट्यपूर्ण ठरला आहे. मराठी साहित्यविषयक चळवळीत पर्यावरणप्रेमी भूमिका घेऊन केलेले लेखन हे त्यांचे आगळेपण आहे. ‘सुवार्ता’ या त्यांच्या नियतकालिकाने मराठी साहित्यात वेगळी ओळख निर्माण केली. त्यांचे लेखन मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे ठरले आहे. त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्षपदाचा मान देखील मिळाला. त्यांच्या निधनामुळे अशा विविध क्षेत्रांना जोडणारा निखळ दुवा निखळला आहे. फादर दिब्रिटो यांना भावपूर्ण श्रद्धांजली. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या अनुयायांच्या दुःखात सहभागी आहोत, असेही मुख्यमंत्री यांनी संदेशात नमूद केले आहे.

पर्यावरणवादी विचारांचा कृतीशील साहित्यिक पडद्याआड

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी मराठी साहित्य, सामाजिक आणि पर्यावरण चळवळीत मोलाचे योगदान दिले आहे. भारतीय संस्कृती आणि संत साहित्याचा गाढा अभ्यास असलेल्या ख्रिस्ती धर्मगुरु फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी समाजात एकता, बंधुता, शांतता,  सामाजिक सलोखा रहावा यासाठी व्याख्यानांच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे काम केले. ‘सुवार्ता’ साप्ताहिकाच्या माध्यमातून पर्यावरण, नागरी, सामाजिक प्रश्न प्रभावीपणे हाताळले. हरित वसई चळवळीसाठी त्यांनी तळमळीने केलेले काम सदैव लक्षात राहील.  त्यांच्या निधनाने पर्यावरणवादी विचारांचा कृतीशील साहित्यिक आज काळाच्या पडद्याआड गेला आहे. मी त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि अनुयायांच्या दुःखात सहभागी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या कार्याचं स्मरण करीत त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

हे ही वाचा:

पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर, बचाव कार्य सुरू CM Shinde यांची माहिती

Olympics 2024 : भारताने उपांत्यपूर्व फेरीत केला प्रवेशन, महिलांनी दमदार कामगिरीने जिंकली मनं

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss