spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

पुन्हा एकदा सर्वसामान्यांना महागाईचा झटका, सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ

महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्य मुंबईकरांना पुन्हा एकदा झटका बसणार आहे.

CNG-PNG Price Hike : महागाईच्या झळा सोसणाऱ्या सामान्य मुंबईकरांना पुन्हा एकदा झटका बसणार आहे. महानगर गॅस लिमिटेडने CNG इंधन दरात पुन्हा एकदा वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. सीएनजीच्या दरात चार रुपयांची तर पीएनजीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे सीएनजी 80 प्रति किलो तर 48.50 रुपये होणार आहे. वाढलेले नवीन दर हे आज मध्यरात्रीपासून लागू करण्यात येणार आहेत.

महानगर गॅस लिमिटेडने यासंबंधी एक पत्रक जारी केलं आहे. देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी मुंबईमध्ये सीएनजीचे दर 29 एप्रिलमध्ये वाढलेले होते. त्यावेळी चार रुपयांनी सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

मुर्मूंना पाठिंब्यापूर्वी साधी चर्चाही नाही, शिवसेनेच्या भूमिकेवर बाळासाहेब थोरातांची नाराजी

Latest Posts

Don't Miss