spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

सर्वसामान्यांचे बजेट गडबडलं; कोथिंबिरीचा दर गगनाला भिडला

आपल्या राज्यात बहुतांश सर्वच भाज्यांमध्ये कोथिंबीर हि वापरली जाते. पण हीच कोथिंबीर सध्या नाशिकच्या मार्केटमध्ये भाव खायला लागली आहे. सोन्याच्या भावाने हि कोथिंबीर विकली जात आहे. सर्वच भाज्यांत वापरली जाणारी कोथिंबीर सध्या नाशिकमध्ये (Nashik) 'भाव' खात असून सोन्याच्या भावाने विकली जात आहे.

आपल्या राज्यात बहुतांश सर्वच भाज्यांमध्ये कोथिंबीर हि वापरली जाते. पण हीच कोथिंबीर सध्या नाशिकच्या मार्केटमध्ये भाव खायला लागली आहे. सोन्याच्या भावाने हि कोथिंबीर विकली जात आहे. सर्वच भाज्यांत वापरली जाणारी कोथिंबीर सध्या नाशिकमध्ये (Nashik) ‘भाव’ खात असून सोन्याच्या भावाने विकली जात आहे. कोथिंबिरीचा दर गगनाला भिडला असून कोथिंबीर जुडी थेट २०० रुपयांना विकली जात आहे.

नाशिक शहरासह पावसाने उघडीप दिली असली तरी अनेक भागात पावसाने भाजीपाल्याची अवस्था खराब केली आहे. यामुळे अद्यापही शेतमालाची आवक देखील बाधित झाली आहे. नियमित होत असेल्या आवकेच्या तुलनेत अवघी ५० ते ६० टक्के आवक सध्या सुरू असल्याने भाजीपाल्याचे दर कडाडलेलेच आहेत. पालेभाज्या तर मिळेनाशा झाल्या आहेत. ज्या थोड्याफार पालेभाज्या उपलब्ध होत आहेत. त्यांचे दरही जास्त असल्याचे चित्र आहे. आवक कमी झाल्याने नाशिकमध्ये सध्या कोथिंबिरीला चांगला भाव मिळत आहे. जवळपास १६० रुपये जुडी एवढा भाव व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्याला मिळत असून बाजारात २०० रुपयांनी कोथिंबीर जुडीची विक्री होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असून सर्वसामान्यांनी मात्र तोंडात बोटे घातली आहेत. नाशिक जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी भाजीपाला दर मात्र चढेच आहेत. अशातच सर्वच भाज्यांत ( vegetables rates hike) वापरल्या जाणाऱ्या कोथिंबीर जुडीने उच्चांक गाठला आहे. ऐन सणाच्या काळात कोथिंबिरीचा भाव वाढला आहे.

शेतकरी बांधवांकडील भाजीपाला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल होत असतो. तेथून विक्रेत्यांकडून भाजीपाला खरेदी करत किरकोळ बाजारात विक्री केली जाते. नियमित आवकेच्या सुमारे ५० ते ६० टक्केच आवक सध्या होत आहे. त्यामुळे कोणत्याही भाजीचे दर २० किंवा ३० रुपये पावशेरपासून सुरु होऊन १२० ते १६० रुपये किलोपर्यंत जात आहेत. दरम्यान बाजारात भेंडी, शिमला, गिलके, दोडके, बटाटे, वांगी अशा नेहमीच्या भाज्या आवाक्याबाहेर दिसत असल्याने मुलांच्या डब्यात काय द्यायचे असा प्रश्न गृहिणींना सतावत आहे.

हे ही वाचा:

टेंभी नाका देवीच्या आरतीचा मान कोणाला?

नवरात्रीमध्ये बनवा स्पेशल पनीर बुर्जी , कांदा आणि लसूण न वापरता

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss