Gautami Patil गौतमी पाटीलच्या चालू कार्यक्रमात दगडफेक, चाहते चढले स्टेजवर

Gautami Patil गौतमी पाटीलच्या चालू कार्यक्रमात दगडफेक, चाहते चढले स्टेजवर

सोशल मिडिया स्टार गौतमी पाटील (Gautami Patil) ही तिच्या नृत्यामुळे खूप प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करुन लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती. आता मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे. आईचे आजारपण आणि खरची परिस्थिती यामुळे शिक्षण सोडून नृत्याकडे(lavani dance) वळल्याचे ती सांगते. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्या दुप्पट तिचे सोशल मीडियावर लाखोने चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. तिच्या कार्यक्रमांना होणारी गर्दीही नवीन नाही, मात्र तिच्या एका कार्यक्रमादरम्यान एवढी गर्दी झाली, की चाहते नियंत्रणाबाहेर गेले आणि त्यांनी राडा केला.

हेही वाचा : 

मिंधे सरकारला भानावर आण्यासाठी माविआचा महामोर्चा, मोर्च्यापूर्वी व्हिडिओ मार्फत शक्तिप्रदर्शन

बीडमध्ये (Beed) एका हॉटेलच्या उदघाटनाच्या कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या लावणी डान्सचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी गर्दी होणं अपेक्षित होतं, पण गर्दी झाल्यानं एकाएकी कार्यक्रमस्थळी गोंधळ झाला. परळी रोडवरील कार्यक्रमादरम्यान हा गोंधळ झाल्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. हा सर्व प्रकार पाहता गौतमी पाटीलने चालू कार्यक्रमात डान्स थांबवला. तर या वेळी स्टेजवर दगडफेकही करण्यात आली. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये गौतमी दिसत नसून, स्टेजवर फक्त प्रेक्षकांचाच घोळका दिसत आहे.

Corona virus चीनमधील वाढत्या कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येचं संपूर्ण जगापुढे टेन्शन

लावणीच्या नावाखाली अश्लील डान्स करत असल्याच्या आरोपामुळे गौतमी पाटील चर्चेत आली होती. पण तरीही तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. तिच्या डान्सच्या व्हिडीओ क्लिपही व्हायरल होतात. काही दिवसांपूर्वी तिच्या एका कार्यक्रमात एका शाळेचा छत तुटलं होतं, तसंच एकाचा मृत्यूही झाला होता.

Maharashtra news राज्यात पुणे, वरळीनंतर आज ‘या’ शहरात बंदची हाक, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Exit mobile version