spot_img
Wednesday, September 18, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

जखमी गोविंदांच्या वैद्यकीय तात्काळ मदतीसाठी साधा ‘या’ हेल्पलाईनवर संपर्क

मुंबई म्हंटल की सर्व सण उत्सव यांचे माहेरघर आहे. येथे प्रत्येक जातीतील, पंथातील सण खूप उत्साहात, आनंदात साजरे केले जातात. त्यात दहीकाला किंवा दहीहंडी सारखा उत्सव म्हणजे सोन्याहून पिवळे क्षण असं आपण नक्कीच म्हणू शकतो. दहीहंडीची पंढरी म्हणून ठाणे आणि मुंबईला ओळखले जाते. दहीकाला म्हणजे आबालवृद्धांच्या आवडीचा असा हा सण. हा केवळ सण नव्हे तर एक मोठा उत्सव असतो. हा उत्सव प्रत्येक जण तेवढ्याच आनंदाने, उत्साहाने साजरा केला जातो. त्याचप्रमाणे या दहीकालेसाठी सर्वजण आज उत्सुक तर असतीलच. गेल्या काही वर्षात याच उत्सवाला आता स्पर्धेचं रूप देण्यात आलं आहे. ज्यामुळे हा उत्सव उत्सव कमी आणि स्पर्धा अधिक वाटायला लागला आहे. काही ठिकाणी तर या खेळाला किंवा उत्सवाला राजकीय सोहळा बनवण्यात आले आहे. याच दहीहंडी उत्सवानिमित्त (Dahihandi Mumbai Thane) मुंबई, ठाणे परिसरात लाखो रुपयांचे पारितोषिक असलेल्या उंच दहीहंड्या बांधण्यात आल्या असून या दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथकांमध्ये चुरस रंगणार आहे. या खेळात अनेक गोविंदा यांना दुखापत होते तर यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवीन उपायोजना केल्या आहेत.

आज सर्वत्र मोठ्या उत्साहात दहीहंडीचा सण साजरा केला जात आहे. वेगवेगळी गोविंदा पथके जास्तीत जास्त थर लावण्यास सज्ज झाली आहेत. मात्र, याच दहीहंडीच्या उत्सवात काही वेळेस उंच थरांवरुन पडून गोविंदांना दुखापत होण्याची शक्यता असते. या कारणामुळे गेल्या काही वर्षांत गोविंदा जखमी होऊन मरण पावल्याच्या दुर्दैवी घटनाही घडल्या आहेत. अशा दुर्घटना होऊ नयेत याकरता एक हेल्पलाऊन क्रमांक देण्यात आला आहे. जखमी गोविंदांसाठी या क्रमांकावर संपर्क साधल्यास तात्काळ वैद्यकीय मदत मिळणार आहे. दरवर्षी तरुण गोविंदा मोठ्या प्रमाणात जखमी होत असल्याने व त्यांना तातडीने वैद्याकीय उपचार मिळावेत यासाठी मुंबईतील राज्य सरकारच्या तसेच महानगरपालिकेची केईएम, शीव, नायर व कूपर ही रुग्णालये सज्ज झाली आहेत. नायर रुग्णालयामध्ये ट्रॉमा, शल्यचिकित्सा विभाग आणि अस्थिव्यंगशल्य चिकित्सा विभागात जखमी गोविंदांसाठी ८ ते १० खाटा राखीव ठेवण्यात आल्या असून, आवश्यक सर्व औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आल्याचे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ सुधीर मेढेकर यांनी सांगितले.

डोंबिवलीतील एम्स रुग्णालयाने जखमी गोविंदांसाठी इमर्जेंसी हेल्पलाइन क्रमांक जारी केले आहेत. यासाठी कोणत्याही गोविंदाला ऑर्थोपेडिक किंवा मेंदूला दुखापत झाल्यास तात्काळ वैद्यकीय मदत आणि रुग्णवाहिका सेवासाठी आपत्कालीन हेल्पलाइन नंबर 7506274959 वर कॉल करण्याचे आवाहन एम्सने केले आहे. मुंबई आणि ठाणे परिसरात प्रसिद्ध असलेल्या दहीहंड्यांना काही वेळापूर्वी सुरुवात झाली असून, मुंबईकरांमध्ये याबाबत मोठा उत्साह दिसून येत आहे. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही आज मुंबई परिसरातील विविध दहीहंड्यांना उपस्थित राहणार आहेत. तर भाजपने ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात कमळ दहीहंडीचे आयोजन केले आहे. दरम्यान भांडुपमध्ये मनसेने आयोजित केलेल्या दहीहंडीत जय जवान पथकाने नऊ थरांची सलामी दिली आहे. मनसेचे मोहन चिरात यांनी या दहीहंडीचे आयोजन केले आहे.

हे ही वाचा:

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे ; Raj Thackeray यांचा मालवण घटनेवर प्रक्षोभ

Dahihandi 2024 special : गोपाळकालाची पूर्वसंद्या होणार सुरमई ; गोविंद रे गोपाळा..नाद रंगणार पुणे-नवी मुंबईत

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss