spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Girish Bapat यांची ‘ही’ वादग्रस्त विधानं गाजली होती महाराष्ट्रभर

आज सर्व राजकारणातला धक्का देणारी बातमी ही समोर आली आहे. ती म्हणजे नुकतेच पुण्याचे खासदार आणि भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा घेतला आहे.

आज सर्व राजकारणातला धक्का देणारी बातमी ही समोर आली आहे. ती म्हणजे नुकतेच पुण्याचे खासदार आणि भाजप नेते गिरीश बापट यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७२ व्य वर्षी त्यांनी अखेरचा श्वास हा घेतला आहे. गिरीश बापट (Girish Bapat) हे राज्यातील भाजपच्या जुन्या जाणत्या नेत्यांपैकी असलेले एक आहेत. ते नेहमीच चर्चेत असतात. गिरीश बापट यांनी आपल्या तब्बल ४ दशकांच्या राजकीय कारकीर्दीत संघ स्वयंसेवक, कामगार नेता, नगरसेवक, आमदार आणि खासदार अशा विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. आजही पुण्यातील स्थानिक राजकारणात गिरीश बापट यांचा दबदबा आहे. ३ सप्टेंबर १९५० रोजी पुण्यात गिरीश बापट यांचा जन्म झाला. तसेच गिरीश बापट यांनी त्याच्या राजकीय कारकिर्दीत अनेक अनेक वादग्रस्त विधानं केली होती.

  • कार्यकर्त्यांमध्ये रमतानाच कट्ट्यावर बसून गप्पांचा फड रंगविण्याची हातोटी असल्यामुळे कोठे काय घडत आहे, याची बित्तंबातमी त्यांच्यापर्यंत पोचते. काहीवेळा उत्साहाच्या भरात त्यांनी केलेली वक्तव्ये वादग्रस्त ठरली. तरुणाईला संबोधताना ‘हिरवा देठ‘ हे त्यांचे वक्तव्य सुद्धा चांगलेच गाजले होते.
  • ‘ठेवलेली घरात आली की नवरा-बायकोंची भांडणं होणारच,’ असे विधान बापट यांनी पिंपरीतील एका कार्यक्रमात केले.
  • ‘अर्थमंत्री मुनगंटीवार यांना कामाचा खूप लोड असतो. अनेक फायली आणि ‘चिठ्ठ्या’ असतात. पण या चिठ्ठ्या तसल्या नाहीत. ते वय गेले’.

  • वर्षभरानंतर सरकार बदलणार आहे. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या, असे वक्तव्य गिरीश बापट यांनी डाळिंब उत्पादकांना संबोधित करताना पुण्यात केलं होतं.
  • ‘चल म्हटली की लगेच चालली’ असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी पुण्यातील एका शाळेत झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या उपस्थितीत केले होते.
  • “स्वामी विवेकानंद जेव्हा परदेशात गेले होते तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वामुळे, भाषणामुळे एक युवती प्रभावित झाली . ती सतत त्यांच्या मागे-पुढे करत होती. अखेर ती विवेकानंदांना भेटली आणि लग्न करायचे आहे अशी इच्छा व्यक्त केली. आपण लग्न केले तर मला तुझ्यासारखा तेजस्वी मुलगा होईल असेही ती युवती स्वामी विवेकानंदांना म्हणाली. हे सगळे सांगत असतानाच गिरीश बापट दोन क्षण थांबले आणि म्हणाले की तो काळ आत्तासारखा नव्हता, चल म्हटले की चालली!”

हे ही वाचा : 

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करण्याविषयी सरकारच्या अनास्थेवरुन अजित पवार सरकारवर संतापले

काँग्रेसने रणशिंग फुंकले, कर्नाटकमध्ये १२४ उमेदवारांची यादी जाहीर

राहुल गांधींचं सदस्यत्व रद्द केल्यानंतर अनेक राज्यकर्त्यांकडून ट्विट करत राहुल गांधींना समर्थन

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss