spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मोठी बातमी ! दिवाळी दरम्यान देशात पुन्हा कोरोना पसरणार?, नव्या व्हेरीएंट महाराष्ट्रासह मुंबईची झोप उडणार

ज्याची भीती होती अखेर तेच घडताना असलायची चाहूल लागली आहे. आता कुठे कोरोना संसर्गाच्या संकटातून संपूर्ण जग सावरण्याचा प्रयत्न करत होतो, त्यातच या प्रयत्नांना अपयश मिळताना दिसत आहे. कारण, कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट भारत देशात सक्रीय होताना दिसत आहे. याबाबत तज्ज्ञांनी सावध राहण्याचा इशारा दिला आहे. दिवाळी अगदी तोंडावर आली आहे. कोरोनामुळे दोन वर्षे कोणती ही धामधूम न करता अगदी साध्या पद्धतीने लोकांनी सगळे सण उत्सव साजरा केले होते. पण, यावर्षी मात्र निर्बंधमुक्त दिवाळी साजरा करु, अशा आशेवर सर्वजण असताना त्यावर संकटांचं विरजण पडलं आहे.

हेही वाचा : 

NZ vs IND: भारत आणि न्यूझीलंड सराव सामना रद्द

हे संकट आहे ओमायक्रॉन व्हेरीएंटचा नवीन उप्रकार बीए. ५.१.७ चं. तज्ज्ञांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार, इतर व्हायरसच्या तुलनेत हा नवा व्हेरिएंट अत्यंत वेगाने पसरत आहे. महाराष्ट्र आणि केरळसारख्या राज्यांनी वाढत्या रुग्णसंख्येमुळे मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. मुंबईमध्ये गेल्या ३ दिवसांमध्ये कोरोनाचे १५० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येदरम्यान, गेल्या पाच दिवसांपासून दररोज १० रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.

‘मशाल’ उद्धव ठाकरेंन सोबतच; समता पक्षाची याचिका हायकोर्टानं फेटाळली

गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरला भारतातील बीएफ. ७ या सब-व्हेरिएंटचे पहिले रुग्ण आढळले होते. चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यास हाच सब व्हेरिएंट कारणीभूत ठरत आहे अशीही माहिती समोर आलीये. मुंबईतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते हिवाळ्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईमध्ये इन्फ्लूएंजासारख्या आजारांवरही बारीक नजर ठेवली जाता आहे. हा आजारही संसर्गजन्य आहे. दरम्यान, काही लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला असेल तरी ते त्याला सामान्य सर्दी खोकला समजून कोरोना चाचण्या टाळू शकता. त्यामुळे तोपर्यंत हा विषाणू इतरांकडे पसरलेला असेल. तज्ज्ञांच्या मते कोरोनामुळे बचावासाठी खबरदारी बाळगली पाहिजे.

पोलिसांची दिवाळी गोड करा; मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांचा उपमुख्यमंत्र्यांना पत्र

Latest Posts

Don't Miss