बैलपोळा सणावर लम्पी आजाराचे सावट

भारत हा देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतीमध्ये चांगले पीक येण्यासाठी बैलाचे खूप मोठे योगदान आहे.

बैलपोळा सणावर लम्पी आजाराचे सावट

भारत हा देश कृषी प्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतीमध्ये चांगले पीक येण्यासाठी बैलाचे खूप मोठे योगदान आहे. आज १४ सप्टेंबर २०२३ या दिवशी बैलपोळा हा सण साजरा केला जातो. वर्षभर शेतकऱ्यांसोबत शेतात राबणाऱ्या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. या दिवशी मोठ्या उत्साहाने बैलाची पूजा करून त्याला नैवेद्य म्हणून पुरणपोळी आणि भाताचा नैवेद्य दाखवला जातो. बैलपोळ्याच्या दिवशी शेतकरी बैलाला शेतात काम करायला लावत नाहीत. पण यावर्षी बैलपोळा सणावर लम्पी स्कीन (Lumpy Skin Disease) आजाराचं सावट आलं आहे. ग्रमीण भागात लम्पी आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हा आजार वाढल्यामुळे बैलपोळा हा सण साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बैलपोळ्याच्या दिवशी बैलाची पूजा केली जाते. या दिवशी बैलाला सजवून त्याच्या अंगावर रंगीबेरंगी कवड्यांच्या माळा, घागर माळा, त्याचबरोबर झुले, विविध प्रकारचे कंडे, गोंडे, चंगाळी, बैलाच्या शिंगाना देण्यासाठी विविध प्रकारचे कलर करून बैलाला सजवले जाते. बैल पोळ्याच्या आधल्या दिवशी बैलाच्या अंगाला हळद आणि तूप लावून शेकवले जाते. त्यांच्या पाठीवर नक्षीकाम केलेली झूल, सर्वांगावर गेरुचे ठिपके, शिंगांना बेगड, डोक्याला बाशिंग, गळ्यात कवड्या आणि घुंगरांच्या माळा, नवी वेसण, नवा कासरा पायात चांदीचे वा करदोड्याचे तोडे घातले जातात. या सणाच्या दिवशी गोड पुरणपोळी आणि सुग्रास अन्नाचा नैवेद्य बैलाला दाखवला जातो. प्रत्येक शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बैलाला सजवतो. महाराष्ट्रातील खेड्यांमध्ये हा सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. प्रत्येक घराला आंब्याच्या पानांचे तोरण बांधले जाते. त्यानंतर गावातल्या सर्व बैलजोड्या, वाजंत्री, सनई, ढोलताशा वाजवत एकत्र येतात.

यावर्षी ग्रामीण भागात लम्पी आजाराचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे बैलपोळा सणाला निर्बंध लावण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी बैलपोळा सणाच्या दिवशी बैल एकत्रित आणणे, बैल फिरवण्यासारख्या प्रथा आहेत. पण यावेळी लम्पी आजाराचे रुग्ण वाढल्यामुळे बैल फिरवण्यावर बंदी आणली आहे. बैल फिरवण्याच्या वेळेस अनेक पशुधन एकत्र येत असतात आणि त्यातून रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून हे निर्बध घालण्यात आले आहे. बीड जिह्ल्यातील ११ गावामध्ये लम्पी आजाराचे रूगन वाढले आहेत. त्यातील काही लम्पी झालेल्या जनावरांचा मृत्यू झाला आहे.त्यातच आता बैलपोळा हा सण आला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं खबरदारी घेतली आहे.

हे ही वाचा: 

राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

उपोषण सोडताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version