Cyclone Mandous मंदोस चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसला, सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची वाढली चिंता

Cyclone Mandous मंदोस चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्रालाही बसला, सिंधुदुर्गात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू बागायतदारांची वाढली चिंता

तामिळनाडूतील (TamilNadu) समुद्रकिनारपट्टी ओलांडल्यानंतर मंदोस चक्रीवादळाचा (Cyclone Mandos) जोर कमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात मंदोस चक्रीवादळाचं अस्मानी संकट पाहायला मिळत आहे. मंदोस चक्रीवादळ चेन्नईच्या किनाऱ्यावर धडकलं, त्यानंतर शनिवारी (१० डिसेंबर २०२२) तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला. तामिळनाडूमध्ये चक्रीवादळामुळे चार जणांचा मृत्यू झाला. चक्रीवादळामुळे काही घरांचे नुकसान झालं. असं असलं तरी वर्तवण्यात आलेल्या अंदाजापेक्षा तामिळनाडूमध्ये चक्रीवादळाचा फटका कमी बसला आणि जास्त नुकसान झालं नाही, मात्र चक्रीवादळाचं संकट ओसरले असले तरी, महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी बरसात आहे.

हेही वाचा : 

Indian Navy भारताच्या लष्करी इतिहासातील हे एक ऐतिहासिक पाऊल, पहिल्यांदाच महिलांना कमांडो होण्याची संधी

सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यात सर्वच भागात रात्रीपासून सकाळपर्यंत पावसाच्या (Rain) हलक्या स्वरुपाचा सरी पडत आहेत. अवकाळी पावसामुळे आंबा (Mango), काजू (Chashwe) बागायतदारांची चिंता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे आधीच मोहोर काळवंडला आहे. त्यातच आंबा आणि काजू पिकावर मोहोर तसेच फळधारणा होताना अवकाळी पाऊस (Unseasonal rain) पडत असल्याने कीडरोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर आहे. चक्रीवादळामुळे (Cyclone) कोकणात अवकाळी पावसाचा परिणाम जाणवत असून वेधशाळेने पुढील चार दिवस अलर्ट दिला आहे.

चक्रीवादळामुळे १२ डिसेंबर रोजी मुंबईच्या काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. त्याचसोबत कोकणासह मुंबई, पुणे, मराठवाड्यासह विदर्भात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चक्रीवादळामुळे राज्यातील बहुतांश भागात ढगाळ वातावरण राहणार असून तापमान देखील वाढण्याची शक्यता आहे.

BEST Premium Bus बीकेसी ते ठाणे ‘बेस्टची प्रीमियम बस’सेवा सोमवारपासून होणार सुरू

या चक्रीवादळामुळे या राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकाटात आला आहे. १२ ते १५ डिसेंबर दरम्यान महाराष्ट्र, मध्ये प्रदेश आणि गुजरातच्या बहुतांश भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये या चक्रीवादळामुळे पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने शेतकरी आणि नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Happy Birthday Sharad Pawar : जाणून घ्या बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांच्यातील व्यक्तिगत नातं

Exit mobile version