Wednesday, September 25, 2024

Latest Posts

मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेत-पिकांचे नुकसान

जुलै महिन्या झालेल्या पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्याला पूरपरिस्तिथी निर्माण झाली.  दमदार पावसामुळे जिल्ह्यातील दुष्काळ मिटला मात्र, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले  आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टी झाल्याने शेकडो हेक्टर पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. राज्यात 8 लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तर नांदेडमध्ये तीन लाख हेक्टर तर वर्ध्यात 1 लाख 30 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे.

गेल्या काही दिवसात राज्यात मुसळधार पाऊस पडल्यामुळे आठ लाख हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तर सुमारे चार हजार हेक्टर जमिन खरडली गेली आहे. चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, नांदेड, हिंगोली, बुलढाण्यात आदी जिल्ह्यांत अतिवृष्टी व त्यानंतर उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे शेतपिकांचे सर्वाधिक नुकसान झाले आहे.

मराठवाड्यात सोयाबीन, तूर आणि मूग या पिकांची सर्वाधिक लागवड केली जाते. काळाच्या ओघात शेतीचे चित्र बदलत आहे. पूर्वी नांदेड जिल्ह्यातही गावरान भातशेतीचे मोठे क्षेत्र होते, मात्र गेल्या काही वर्षांत निसर्गाच्या सततच्या उदासीनतेमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी शेती सोडून दिली होती. आजही तेथील शेतकऱ्यांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी तेलंगणाच्या सीमेला लागून असलेल्या नांदेडमध्ये गावरान भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होत होती.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील काही पिके धोक्यात आली आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थितीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दुसरीकडे या पावसाने नांदेड जिल्ह्यातील पीक पद्धतीत बदल होण्याची आशा निर्माण झाली आहे. गेल्या 4 दिवसांपासून पाऊस थांबला असला तरी पुढील दोन दिवस मराठवाड्यातील हिंगोली आणि नांदेडमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे

हेही वाचा : 

जेवणाच्या ऑर्डरवरून वाद पेटला, हॉटेलच्या शेफने केली वेटरची हत्या

Latest Posts

Don't Miss