spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

घाटकोपर मध्ये एका घरावर कोसळली दरड

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार धरल्याने आज सकाळी सातच्या दरम्यान घाटकोपरच्या पंचशीलनगर येथील एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली.

गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. उपनगरात मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार धरल्याने आज सकाळी सातच्या दरम्यान घाटकोपरच्या पंचशीलनगर येथील एका घरावर दरड कोसळल्याची घटना घडली.डोंगरावरील मोठी झाडे पडल्याने दरड घरावर कोसळली. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही; मात्र घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी घाटकोपर पोलिस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत परिवाराला बाहेर काढून अडकलेले सर्व सामान बाहेर काढण्यात मदत केली. पंचशीलनगरातील साई प्रेरणा सोसायटी ग्रुप नंबर ५ येथील घरावर सकाळी दरड कोसळली. बबन घनवट यांचे हे घर असून त्यांनी हे घर संतोष उपाळे यांना भाडेतत्त्वावर दिले आहे.

संतोष उपाळे यांच्यासह चार ते पाच जण या घरात राहतात. पंचशीलनगराजवळील खंडोबा टेकडी येथे दरवर्षी पावसाळ्यात माती खचण्याचे प्रकार घडत असतात. त्यामुळे पंचशील नगर येथे दरड कोसळल्याने चाळीतील रहिवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आज सकाळीच घरावर दरड कोसळून पत्रे आणि भिंत कोसळली.तेथील रहिवाशांच्या माहितीनुसार आम्ही इथे पाच जण राहतो. सकाळी मुलीला शाळेत सोडले आणि आम्ही बाहेर होतो त्या वेळेस अचानक काही कोसळल्याचा आवाज आला. यात आमच्या घरातील वस्तूंचे नुकसान झाले आहे. चारही भिंतींना तडे गेले आहेत. पत्रे तुटले आहेत. सध्या शेजारी असलेल्या घरात आम्ही स्थलांतरित झालो आहोत. – संतोष उपाले, भाडेकरू…खंडोबा टेकडी येथे दर वर्षी पावसाळ्यात दुर्घटना घडत असते. सध्या अनेक ठिकाणी संरक्षण भिंतीची कामे बाकी आहेत. रात्री पाऊस जास्त पडला की रहिवाशांनाच सतर्क राहावे लागते. दरड रात्री कोसळली असती तर जीवितहानी झाली असती

Latest Posts

Don't Miss