शीतयुद्ध संपवण्यात महत्त्वाचा वाटा असलेले मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन

शीतयुद्ध संपवण्यात महत्त्वाचा वाटा असलेले मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे निधन

सोव्हिएत युनियनचे माजी नेते आणि रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष मिखाईल गोर्बाचेव्ह यांचे आज (३१ ऑगस्ट २०२२) मंगळवारी दीर्घ आजाराने निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. शीतयुद्धाच्या काळात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली होती. मात्र, सोव्हिएत युनियनचे विघटन रोखण्यात त्यांना अपयश आले होते. मिखाईल गोर्बाचेव्ह हे किडनीच्या विकाराने दीर्घकाळापासून आजारी होते. गेल्या काही दिवसांत त्यांची तब्येत जास्तच खालावली होती. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु या उपचारांदरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.

हेही वाचा : 

भाजपच्या निलंबित नेत्या सीमा पात्रा पोलिसांच्या अटकेत, घरगुती नोकराचा छळ केल्याचा आरोप

संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख आँटोन गट्रेस यांनी दु:ख व्यक्त केले आहे. “मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या रुपाने जगाने एक मोठा नेता गमावला आहे. मिखाईल हे शांततेचे पुरस्कर्ते होते, शितयुद्धाच्या काळात त्यांची भूमिका अंत्यत महत्त्वाची होती, अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्वीटद्वारे दिली.

कामाच्यावेळी आळस आणि झोप येतेच पण ते टाळायचे असेल तर, हे नक्की वाचा

त्याचबरोबर राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी देखील ट्वीटद्वारे भावना व्यक्त केली आहे. “नोबेल शांतता पुरस्कार विजेते मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्या निधनाने दु:ख झाले आहे. ते एक व्यावहारिक सोव्हिएत नेते होते. ज्यांनी इतिहासाचा मार्ग बदलला आणि सुसंवाद आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कार केला. त्यांच्या कुटुंबियांना आणि त्यांच्या अनुयायांसाठी माझ्या मनःपूर्वक संवेदना.” अशी प्रतिक्रिया त्यांनी ट्वीटद्वारे दिली.

सणासुदीच्या काळात नागरिकांना दिलासा, राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

Exit mobile version