इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यत ही मृतांची संख्या २९ इतकी झाली आहे.

इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमध्ये मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

रायगडमधील इर्शाळवाडी दरड दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या वाढत चालली आहे. आतापर्यत ही मृतांची संख्या २९ इतकी झाली आहे. त्याचबरोबर ५२ ग्रामस्थ अद्याप बेपत्ता आहेत. या ठिकाणी आजही बचाव मोहीम सुरू असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचदरम्यान पावसामुळे दरडी कोसळ्याची शक्यता असल्याने इतरांना इर्शाळवाडीत येण्यास मनाई करण्यात आली आहे. स्थानिक प्रशासनाकडून इर्शाळवाडीत कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. बुधवारी रात्री इर्शाळवाडीवर दरड कोसळली. त्यात ४८ पैकी १७ घरं गाडली गेली आहेत. त्यानंतर लगेचच म्हणजे गुरुवार पहाटेपासून बचावकार्याला सुरूवात झाली होती. त्यामध्ये १०० हुन अधिक लोकांचे जीव वाचले परंतु मृतांचा आकडा वाढत चालला आहे.

आज बचावकार्याचा चौथा दिवस असून सकाळपासून दोन मृतदेह काढण्यात आलेत. दरम्यान दरड दुर्घटनेतून वाचलेल्या ग्रामस्थांना धीर देऊन त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं आहे. तर सोमवारपासून रेस्क्यू ऑपरेशन बंद करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. इर्शाळवाडी परिसरात पर्यटक, नागरिकांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दरड कोसळलेल्या घटनास्थळांचे ठिकाणी आणि त्याच्या परिसरात इर्शाळगड, नंबराची वाडी येथील दुर्घटनास्थळी, बेस कॅम्प परिसरात शासकीय मदत यंत्रणा तसेच मदतकार्यात नेमणूक केलेल्या इतर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांच्या व्यतिरिक्त इतर नागरिक, पर्यटक व ट्रेकर्स यांना प्रवेशास निर्बंध करण्यात आला आहे.

माळीण येथील घटनेप्रमाणे रायगडमधील मागच्या घटनेतही मृतदेह बाहेर काढता न आल्याने ते तिथेच कुजले होते आणि त्याच ठिकाणी त्यांचे पंचनामे करावे लागले होते. इर्शाळवाडीत देखील आता त्याचप्रमाणे परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती मंत्री गिरीश महाजनांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे मृतांचा आकडा हा वाढू शकतो असंही ते म्हणाले. धोक्याच्या यादीत इर्शाळवाडी गाव नव्हतं, अचानक हे संकट कोसळलं असल्याचं मंत्री गिरीश महाजन म्हणाले. एवढं मोठं संकट येईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं, असं त्या ठिकाणच्या रहिवाशांनी सुद्धा म्हटल्याचं महाजन म्हणाले.

हे ही वाचा:

भारतासाठी तिसरा दिवस ठरला कठीण, वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे उत्तम प्रदर्शन

समृद्धी महामार्गावरील टोल प्रकरणावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले “साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले…

समृद्धी महामार्गावरील टोल प्रकरणावर अमित ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले “साहेबांमुळे ६५ टोलनाके बंद झाले…

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version