Friday, September 27, 2024

Latest Posts

पालकमंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे.

नांदेडच्या शासकीय रुग्णालयात गेल्या २४ तासांत २४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. या घटनेमुळे संपूर्ण नांदेड शहर हादरून गेले आहे. ही घटना घडल्यानंतर शासकीय रुग्णालयात छावा संघटना आणि स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते दाखल झाले. त्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी रुग्णालयात गोंधळ घातला. तसेच त्यांनी पालकमंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री तानाजी सावंत आणि रुग्णालय प्रशासन यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नांदेड मधील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात ३० सप्टेंबर ते १ ऑक्टोबर २०२३ या २४ तासाच्या कालावधीत २४ रुग्णाचा मृत्यू झाला. यामध्ये १२ नवजात बालकांचा समावेश आहे. १२ रुग्णांमध्ये ५ पुरुष आणि ७ स्त्रियांचा समावेश होता. रुग्णामध्ये ४ हृदयविकार, १ विषबाधा, १ जठरव्याधी, २ किडनी व्याधी, १ प्रसूती गुंतागुंत, ३ अपघात आणि इतर आजाराने तर बालकांपैकी ४ अंतिम अवस्थेत खाजगी रुग्णालयातून आली होती. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात औषध उपलब्ध आहेत. दरवर्षी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून १२ कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. तसेच अजून ४ कोटी रुपये मंजूर झाल्याचे जिल्हा रुग्णालय प्रशासनाच्यावतीने सांगण्यात आले आहे.

डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाचे डीन म्हणाले ‘ दररोज आमच्याकडे गंभीर अवस्थेत १२ ते १३ रुग्ण येतात. त्यामध्ये काहीच मृत्यू होते. लहान मुलांचा मृत्यू हा नैसर्गिक आणि प्रौढ रुग्णांचा मृत्यू हा व्याधी आणि वय झाल्यामुळे झाला असे सांगण्यात आले आहे. तसेच इथे आलेले रुग्ण हे गंभीर अवस्थेमध्ये होते. गंभीर आजारामुळे १२ रुग्णांनाचा मृत्यू झाला. लहान मुले ही अतिशय क्रिटिकल परिस्थितीत इथे दाखल झाले होते. असे रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नांदेडच्या शासकीय रुग्णालयात (Nanded Government Hospital) जाऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आहे. तसेच, चोवीस रुग्णांचा मृत्यूनंतर रुग्णालयात असलेले आणखी ७० रुग्ण अत्यवस्थ असून, या रुग्णांना वाचवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत.

हे ही वाचा: 

Latest Posts

Don't Miss