spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

अफजल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात, पोलिसांचा चोख बंदोबस्त

प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम कोणत्याही क्षणी काढली जाणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. कबरीजवळ पोकलेन मशीन तैनात केली असून अनेक ठिकाणी बॅरिगेट्स लावली जात आहे. १९९० पासून या कबरीबद्दलचा वाद सुरू होता.अफजलखानाच्या कबरीभोवती वनखात्याच्या हद्दीत काही अतिक्रमणं केली जात होती. दर्गा बांधला जात होता. अफजलखानाचं दैवतीकरण केलं जात असल्याचा आरोप १९९० सालीच केला होता. तेव्हापासून हा वाद सुरू होता. याप्रकरणी कोर्टाने २०१७ साली निर्णय देत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यानंतर अद्याप कारवाई झाली होती. अखेर आज ही कारवाई होत आहे. रात्रीपासूनच गुप्तपणे या हालचालींना वेग आला होता. आता ही अतिक्रमणं पाडण्यास सुरुवात होत आहे.

हेही वाचा : 

Sanjay Raut : ‘फोनवर बोलताना उद्धव ठाकरेंच उर भरुन आला, मलाही भरुन आलं’, संजय राऊत भावुक

अफझल खान यांची प्रतापगडावरील कबर पाडण्यात यावी अशी मागणी काही संघटनांनी केली होती. मात्र सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार प्रतापगडावरील कबरीच्या ठिकाणी केलेलं अनधिकृत बांधकाम पाडण्यात यावं असे आदेश देण्यात आले होते. गेल्या अनेक वर्षांपासून अफझल खान यांच्या कबरीजवळ अनधिकृत बांधकाम पाडलं जात असेल, तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, असं राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलंय. अफझल खान हा स्वराज्याचा शत्रू होता. अफझला खानाचा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला हा वध शिवरायाचं शौर्य दाखवतं.
कबर उद्ध्वस्त करण्याची काही लोकं मागणी करत आहेत. पण कबर उद्ध्वस्त केल्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्षही उद्ध्वस्त होऊ शकते, असंही अमोल मिटकरी यांनी यावेळी म्हटलं.

१५०० पोलिसांचा बंदोबस्त घटनास्थळी तैनात

प्रतापगडावरील अफजल खानच्या कबर परिसरात झालेले अतिक्रमण बुधवारी पहाटे तब्बल १५०० पोलिसांच्या चोख बंदोबस्तात हटवण्यात आले असून परिसरात १४४ कलम जारी करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी अतिशय गोपनीय पद्धतीने ही मोहीम राबवली. छत्रपती शिवाजी महाराजांचा जबरदस्त पराक्रम म्हणून प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानचा कोथळा काढल्याचा इतिहास आहे. आजही त्याची साक्ष म्हणून अफजल खानची कबर आहे. मात्र गेल्या काही वर्षात त्या परिसरात इतर काही प्रमाणात अतिक्रमण वाढले होते. यातून अनेकदा वाद – प्रतिवाद सुरू होता. कायदा आणि सुव्यवस्था निर्माण होण्याचे विषय ऐरणीवर आले होते.

महाराष्ट्रातील उद्योग बाहेर नेऊन, पंतप्रधान मोदी राज्यातील युवकांचा रोजगार हिरावून घेत आहेत ; राहुल गांधींचा हल्ला

Latest Posts

Don't Miss