Friday, September 27, 2024

Latest Posts

कोकणात जाणाऱ्या एक्सप्रेसचा खोळंबा, दिवा रेल्वे स्थानकात रेल रोको

कोकणात जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वे रखडून राहिल्यामुळे दिवा रेल्वे स्थानकांवर नागरिकांचा खोळंबा झाला आहे. संतप्त नागरिकांनी रेल्वे रोखून धरली होती.

कोकणात जाणाऱ्या एक्सप्रेस रेल्वे रखडून राहिल्यामुळे दिवा रेल्वे स्थानकांवर नागरिकांचा खोळंबा झाला आहे. संतप्त नागरिकांनी रेल्वे रोखून धरली होती. काल संध्याकाळी पनवेल आणि कळंबोलीच्या मध्ये मालगाडीचे डबे घसरले होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या उशिरा धावत आहेत. तर आज अनेक गाड्या रद्द देखील करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांनी दिवा रेल्वे स्थानकांवर रेल रोको केले. प्रवाशांनी सुमारे ४० मिनिटं रेल्वे रोखून धरल्यानंतर प्रवाशांना बाजूला करण्यात आले. त्यानंतर काहीवेळाने लोकल पूर्वरत करण्यात आली.

काल संध्याकाळी पनवेल रेल्वे स्थानकांवर मालगाडीचे डब्बे घरून पडले होते. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिवा रेल्वे स्थानकांवर रखडून राहावे लागले. त्यामुळे संतप्त प्रवाशांनी रेल्वे रोखून धरली. पोलिसांच्या प्रयत्नानंतर सुमारे ४० मिनिटांनी लोकांना बाजूला करण्यात आले. मालगाडीचे डब्बे घसरल्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या उशिरा धावत आहेत. तसेच आता लोकल सेवा पूर्वरत झाली आहे. लवकरच कोकण रेल्वे मार्गाची वाहतूक सुद्धा सुरू होणार असल्याची माहिती स्टेशन मॅनेजर यांनी दिली आहे.

शनिवारी ३० सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजून ५ मिनिटांनी पनवेलवरुन वसईकडे जाणाऱ्या मालगाडीचे डबे रेल्वे रुळावरुन घसरले. वॅगन आणि ब्रेकव्हॅन असे दोन डब्बे रुळावरून घसरल्यामुळे पनवेल ते कळंबोली स्थानकादरम्यानची पूर्ण वाहतूक ठप्प झाली. ही घटना घडल्यानंतर लगेच मध्य रेल्वेकडून अभियांत्रिकी पथक पाठवण्यात आले. तसेच कल्याण आणि कुर्ला स्थानकावरुन अॅक्सिडेंट रिलीफ रेल्वे घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. रुळावर घसरलेले डब्बे बाजूला करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. पण या घटनेमुळे कोकणात तसेच लांब पाल्याच्या गाडयांचा खोळंबा झाला आहे.

Latest Posts

Don't Miss