spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Devendra Fadnavis in Wardha: PM Modi यांनी जे परिवर्तन सुरु केलंय ते मी महाराष्ट्रात सुरु केले, आता साडे सहा लाख लोकांचे जीवन बदलणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्रातील वर्धा येथे आले असून पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीच्या कालखंडात केलेल्या प्रगतीला अधोरेखित करण्यासाठी आयोजित केलेल्या राष्ट्रीय पीएम विश्वकर्मा कार्यक्रमात ते उपस्थित आहेत. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान पीएम विश्वकर्मा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र आणि कर्ज वितरित करण्यात येणार आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनतेला संबोधित केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी महोदयांनी जे परिवर्तन सुरु केलंय ते मी महाराष्ट्रात देखील सुरु केले आहे. सोयाबीनला भाव मिळाले आहेत. शेतकऱ्यांसाठी आमच्या सरकारने मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे खूप आभार! त्यांच्या आदर्शाने आम्ही लखपती दीदी, लाडकी बहीण योजनेचा लाभ महिलांना देऊ शकत आहोत. देशाला सात टेक्सटाईल पार्क मिळाले आहेत. त्यातील एक पार्क अमरावतीला मिळाला आहे. त्यामधून अनेकांना रोजगार लाभला आहे. राज्यातील दोन लाख नागरिकांना पीएम विश्वकर्मा योजनेचा लाभ आज मिळत आहे. यामुळे साडे सहा लाख लोकांचे जीवन बदलणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रातील अमरावती येथे प्रधानमंत्री मेगा इंटिग्रेटेड टेक्स्टाईल रिजन अँड अपारेल (पीएम मित्र) पार्कची पायाभरणीही होणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळातर्फे राज्य अंमलबजावणी संस्था म्हणून हे पार्क १००० एकरात उभारण्यात येत आहे. सरकारने वस्त्रोद्योग उद्योगासाठी सात पीएम मित्र पार्क उभारण्याला मंजुरी दिली आहे. भारताला वस्त्रोद्योग आणि निर्यातीचे जागतिक केंद्र बनवण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाला प्रत्यक्षात आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या पार्कमुळे थेट परदेशी गुंतवणुकीसह इतर प्रकारची गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आकर्षित होईल आणि या क्षेत्रातील नवोन्मेष आणि रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल. राज्यातील १,५०,००० युवक युवतींना दरवर्षी निःशुल्क कौशल्य विकास प्रशिक्षण मिळू शकेल, पंतप्रधानांच्या हस्ते “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा” शुभारंभ होणार आहे. या योजनेंतर्गत, महाराष्ट्रातील महिलांच्या नेतृत्वाखालील नवउद्यमी स्टार्टअप्सना प्रारंभिक टप्प्यात मदत दिली जाईल, २५  लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत दिली जाणार आहे.

हे ही वाचा:

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा. 

Latest Posts

Don't Miss