गुलामीच्या खुणा पुसण्याचे काम PM Narendra Modi करत आहेत, Port Blair नामांतरावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

गुलामीच्या खुणा पुसण्याचे काम PM Narendra Modi करत आहेत, Port Blair नामांतरावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

केंद्र सरकारकडून अंदमान आणि निकोबार बेटांची (Andaman and Nikobar Islands) राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे (Port Blair) नाव बदलण्यात आले असून श्री विजय पुरम असे नवे नाव ठेवण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी हि मोठी घोषणा केली. अमित शहा यांनी ट्विटरद्वारे पोस्ट लिहून याची माहिती दिली. “देशाला गुलामगिरीच्या सर्व प्रतिकांपासून मुक्त करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या संकल्पाने प्रेरित होऊन गृह मंत्रालयाने पोर्ट ब्लेअरचे नाव श्री विजया पूरम ठेवल्याचा निर्णय घेतला” असे ते म्हणाले. आता यावरून राजकीय वातावरण गरम झालेले असून विरोधक सत्ताधाऱ्यांना लक्ष करत आहेत. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यावर मोठे भाष्य केले आहे.

याबाबत आज (शनिवार, १४ सप्टेंबर) माध्यमांशी संवाद साधत फडणवीस म्हणाले, “अंदमान निकोबारची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअरचे श्री विजयपुरम असे नामकरण करण्यात आले, त्यावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंद व्यक्त करत गुलामगिरीच्या खुणा पुसल्या पाहिजेत, गुलामगिरीच्या खुणा पुसून टाकण्याचे काम नरेंद्र मोदींनी केले पाहिजे, असे सांगितले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो,” असे ते म्हणाले.

सोयाबीनबाबत फडणवीस म्हणाले की, “भारत सरकारने कच्च्या तेलावरील आयात शुल्क 20% वरून वाढवून 32.5% केले आहे याचा थेट फायदा सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना होणार असून, सोयाबीनच्या भावात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे, त्यासोबतच केंद्र सरकारने कांद्यावरील किमान निर्यात मूल्य रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे ड्युटी 40 वरून 20 वर आणली आहे, कांद्याच्या कोणत्या सक्तीचा फायदा होणार, कांदा बरोबरच बासमती तांदळालाही निर्यात करण्याची परवानगी होती, मात्र निर्यात शुल्क होते, ते शून्यावर आणले आहे, त्यामुळे आमच्या धान उत्पादक शेतकऱ्यांना. त्याचा फायदा होणार आहे, एकंदरीत आपल्या पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे, मी पंतप्रधानांचे आभार मानतो.”

हे ही वाचा:

Nitesh Rane यांच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यावर Ambadas Danve यांचा टोला; गल्लीत डझनभर केळी विकत घेणे आणि देश चालवणे यात फरक…

Rajkot Fort: Chetan Patil चा जामीन अर्ज फेटाळला तर Jaydeep Apte च्या न्यायालयीन कोठडीत वाढ

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version