spot_img
Monday, September 23, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

धनगर आरक्षणावरून धनगर समाज आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा आज पंधरावा दिवस असून सर्व सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे. मात्र अजूनही सरकारकडून यावर कोणतेच ठोस पाऊल उचलण्यात न आल्यामुळे राज्यातील धनगर समाज आक्रमक झाला असून राज्यात विविध ठिकाणी धनगर बांधवांकड़ून रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. धनगर बांधवांनी मेंढर आणून रस्ते अडवल्याची माहिती मिळत असून यावर सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात येत आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात आंदोलन

धनगर समाजाला एस. टी. प्रवर्गातून आरक्षण मिळण्यासाठी गेल्या चौदा दिवसांपासून पंढरपुरात धनगर समाजबांधव उपोषणास बसले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि आरक्षण मिळण्याच्या मागणीकरीता कोल्हापुरातील धनगर समाज आक्रमक झाला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यासोबतच जिल्ह्यातील धनगर समाजाचे नेते बबनराव रानगे, अशोक कोळेकर यांच्यासह मोठ्या संख्येने धनगर समाज बांधव उपस्थित होते. धनगरी ढोल बडवत काहीजण या आंदोलनात सहभागी झाले होते.

शेगावात धनगर समाज बांधवांकडून रास्ता रोको

धनगर समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश करावा या मागणीसाठी पंढरपूर येथे सुरू असलेल्या सकल धनगर समाजाच्या आमरण उपोषणाचा आज पंधरावा दिवस असून सर्व सहा उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावलेली आहे. अजूनही शासनाकडून कोणतेच ठोस पाऊल न उचलल्याने आज सोमवारी राज्यभरात ठिकठिकाणी धनगर समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगावातही आज छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोलापुरात धनगर समाजाला एसटी मधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन सुरू

धनगर समाजाने सोलापूर- विजयपूर राष्ट्रीय महामार्ग रोखला. यावेळी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, काँग्रेस शहाराध्य चेतन नरोटे यांच्यासह सर्व पक्षीय धनगर नेते रास्तारोको मध्ये सहभागी झाले होते. गेल्या काही तासांपासून आंदोलन चालू होते. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पाचे ते सात किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सोलापूर – विजयपूर महामार्गावर ग्रामीण पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळालं. पंढरपूर येथील उपोषणकर्त्यांची सरकारने दखल घेऊन मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करण्यात आली.

धुळे येथे नागपूर सुरत महामार्गवर धनगर समाजाचा रस्तो रोको

धुळ्यातदेखील सकल धनगर समाजाच्या बांधवांनी रस्ता रोको केला. गुजरात हायवेवर आंदोलकांनी चक्काजाम केला. धुळ्यातील आनंदखेडे गावाजवळ रस्ता रोको करण्यात आला. धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले. यावेळी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांचा पुतळा महामार्गावर ठेवत रस्ता रोको करण्यात आला. येलकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात रस्त्यावर मेंढर आणून आंदोलकांनी आंदोलन केले.

धनगर बांधवांनी मेंढर आणून अडवला बारामती वालचंदनगर रोड

पंढरपूर येथे धनगर आरक्षण मागणीसाठी गेली तेरा दिवसापासून आमरण उपोषणासाठी बसले आहेत. सरकार आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरून आज धनगर बांधवांकडून राज्यभर रास्ता रोको केला. गोपीचंद पडळकर यांनी दिला होता राज्यभर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता त्यानुसार राज्यभर आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान धनगर बांधवांनी बारामती वालचंदनगर रोड मेंढर आणून अडवला होता.

हे ही वाचा:

सुप्रिम कोर्टाचा निर्णय देशाच्या बेसिक स्ट्रक्चरविरोधात; आरक्षणावरून Prakash Ambedkar यांचे मोठे वक्तव्य

कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागासवर्ग यादीमध्ये समावेश, मंत्रिमंडळात घेतले महत्त्वपूर्ण निर्णय

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss