मुख्यमंत्री अहमदनगरसह धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर आणखी ५ दिवस पावसाचा इशारा

सध्या राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) चांगलाच धुमाकूळ हा घातलं आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले आहे.

मुख्यमंत्री अहमदनगरसह धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर, तर आणखी ५ दिवस पावसाचा इशारा

सध्या राज्यात अवकाळी पावसानं (unseasonal rains) चांगलाच धुमाकूळ हा घातलं आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान देखील झाले आहे. महाराष्ट्रात गारपीट आणि विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने अनेक जिल्ह्यांमध्ये पिकांचे नुकसान केले आहे. शेतकऱ्यांची पिकं पूर्णपणे खराब झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर काल दिनांक १० एप्रिल रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिक जिल्ह्यातील पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी भेट दिली. यासोबतच नुकसान झालेल्या पिकाचा पंचनामा करून तातडीने मदत देण्याच्या सूचना देखील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच आज देखील मुख्यमंत्री अहमदनगर (Ahmednagar) आणि धाराशीव (Dharashiv) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री जाणार आहेत.

अवकाळी पावसामुळे राज्यातील शेतकरी हवालदिन झाले आहेत. आणि त्यामुळे आज मुख्यमंत्री अहमदनगर आणि धाराशीव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. तसेच आज नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे मुख्यमंत्री पाहणी करणार आहेत. आज सर्वात प्रथम सकाळी १० वाजता मुख्यमंत्री पारनेर तालुक्यातील वनकुटे गावात पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी २ वाजता धाराशीव जिल्ह्यातील धारुर गावात पाहणी करणार आहेत. त्यांनतर दुपारी ३ वाजता वाडीबामणी या गावात नुकसानाची पाहणी करणार आहेत.

एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री नुकसंग्रस्थ विभंगची पाहणी करत आहेत तर दुसरीकडे आणखी ५ दिवस गारपीट, विजांच्या कडकडाटांसह पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. या आनंदामुळे आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी जास्त भर पडली आहे. राज्यात १५ एप्रिलपर्यंत अवकाळी पावसाचे वातावरण कायम राहणार आहे असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

सध्या शेतकरी अवकाळी पावसामुळे मोठया संकटात सापडला आहे. अवकाळी पावसाच्या तडाख्याने काढणीला आलेला गहू, हरभरा, उन्हाळ कांदा, भाजीपाला आणि पिकांना फटका बसला आहे. तसेच फळबागांना देखील मोठा फटका बसला आहे. यामध्ये द्राक्ष, केळी, आंबा, संत्रा या फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच पुन्हा एकदा पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हे ही वाचा : 

शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टीचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल

सुप्रीम कोर्टामध्ये मागणी केल्याचे वृत्त निराधार, शिंदे गटाचे स्पष्टीकरण

सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – एकनाथ शिंदे

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version