मुंबईत धुव्वाधार तर कोल्हापुरात पावसाचा रेड अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज काय?

ठाणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळपासूनच सुरु झालेल्या पावसाने शनिवारी दिवसभर आपला जोर कायम ठेवला. ताज्या हवामानानुसार मुंबई शहर तसेच उपनगरातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे.

मुंबईत धुव्वाधार तर कोल्हापुरात पावसाचा रेड अलर्ट, हवामान खात्याचा अंदाज काय?

ठाणे जिल्ह्यासह अनेक जिल्ह्यात शुक्रवारी संध्याकाळपासूनच सुरु झालेल्या पावसाने शनिवारी दिवसभर आपला जोर कायम ठेवला. ताज्या हवामानानुसार मुंबई शहर तसेच उपनगरातील काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मुंबई कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात पावसाची जोरदार बॅटिंग चालू आहे. आजदेखील (दि. १४ जुलै) रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी तसेच सातारा जिल्ह्यांत जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने या चार जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे. तर मुंबई आणि ठाण्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईसह राज्यातील इतर भागातही मोसमी पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढला आहे. पालघरमध्ये काल दिवसभर मुसळधार पडणाऱ्या पावसाने आज थोडीशी विश्रांती घेतल्याने पालघरकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. असे असले अंतरी पालघर जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट असल्याने आज देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. काल दिवसभर पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदी नाल्यांना पूर आला असून धरण क्षेत्राच्या पाणीसाठ्यातही मोठी वाढ झालेली आहे.

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार रायगड आणि रत्नागिरी या समुद्र किनाऱ्यालगतच्या असेलेल्या जिल्यांमध्ये आज १४ जुलै रोजी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा या दोन जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये आज डोंगराळ भागात अति मुसळधार तर मैदानी भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच राज्यातील अन्य भागातही मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यातही घाटमाथा परिसरात जोरदार पाऊस झाला आहे. भोर, वेल्हा भागात १०० मिलिमीटरच्या वर पाऊस झाला आहे. तर मावळ आणि भीमाशंकर परिसरात २०० मिलिमीटरच्या वर पावसाची नोंद झाली आहे.

हे ही वाचा:

Rain Update : मुंबई, ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस

अभिनेत्री रेखाने घेतली अमिताभ बच्चन यांच्या नातीची किस, व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version