spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

Diwali २०२२ : राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी गिफ्ट ; ऑक्टोबर महिन्याचं वेतन दिवाळीआधीच

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , निमशासकीय ,जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून दिवाळी सणाची मोठी भेट देण्यात आली आहे. यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी मोठ्या आनंदात साजरी होणार आहे.

राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , निमशासकीय ,जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून दिवाळी सणाची मोठी भेट देण्यात आली आहे. यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी मोठ्या आनंदात साजरी होणार आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना दिवाळीचे गिफ्ट दिलं असून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचं ऑक्टोबरचं वेतन दिवाळीपूर्वीच होणार आहे. ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दिवाळी येत आहे, त्यामुळे त्याच्या आधीच कर्मचाऱ्यांचा पगार करण्याचा निर्णय राज्यातील शिंदे सरकारने घेतला आहे.

राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचा फायदा हा जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांपासून ते शिक्षण संस्था, महाविद्यालयं आणि इतर सर्वच कर्मचाऱ्यांना होणार आहे. यंदा दिवाळी ही २२ तारखेपासून सुरू होणार असून त्यापूर्वी म्हणजे २१ तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे. दिवाळीपूर्वीच २१ तारखेला सर्व कर्मचाऱ्यांचे पगार देण्यात यावेत असा आदेश सर्व आस्थापनांना देण्यात आला आहे. अशा प्रकारची मागणी या आधीच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

 मुंबई महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेचे शिक्षक, बेस्टचे कर्मचारी यांना राज्य सरकारकडून दिवाळी बोनस जाहीर करण्यात आला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना २२ हजार ५०० रूपये तर आरोग्य सेविकांना एक पगार दिवाळी बोनस म्हणून दिला जाणार आहे.

हे ही वाचा:

एकनाथ खडसे आणि संजय राऊत यांची भेट; खोके नाही…

ठाकरेंमध्ये थेट हल्ला करण्याची हिंमत नाही ; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टिका

लवकरच येणार प्लॅनेट मराठीवर ‘बेबी ऑन बोर्ड’ नवीन सीरिज

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss