Diwali Gift : एसटी महामंडळाची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची दिवाळी भेट

Diwali Gift : एसटी महामंडळाची मोठी घोषणा, एसटी कर्मचाऱ्यांना पाच हजार रुपयांची दिवाळी भेट

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एसटीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाला दिवाळीची भेट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी अधिकारी व कर्मचाऱ्यांना सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिवाळीची भेट म्हणून देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. तर, यासाठी राज्य सरकारने ४५ कोटी रुपयांची आर्थिक मदत केली आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.

ठाकरे गटाच्या सिलेब्रिटी चेहरा असलेल्या उर्मिला मातोंडकर, दीपाली सय्यद गेल्या कुठे?

या निर्णयाचा फायदा महामंडळाच्या ८७ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांना होणार आहे. दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आर्थिक स्वरूपात दिवाळीची भेट दिली जाते. मागील दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : 

मी उद्धव ठाकरेंसोबत काम करताना त्यांच्या मालमत्तेवर लक्ष ठेऊन नव्हतो: मंत्री उदय सामंत

ही रक्कम लवकरच त्यांच्या बँक खात्यात जमा केली असल्याची माहिती व्यस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली. मागील वर्षी दिवाळीच्या दरम्यान एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ, विलिनीकरण आदींसह इतर मागण्यांसाठी आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन बरेच दिवस चिघळले होते. त्याच्या परिणामही एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर झाला होता.

दरम्यान, याआधी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी २५०० रुपये आणि ५००० रुपयांची दिवाळी भेट देण्यात येत होती. यंदाच्या वर्षी मात्र कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपयांची दिवाळी भेट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे प्रवासी संख्या घटल्याने एसटीला आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीतही महामंडळाकडून यंदा सरसकट अधिकारी व कर्मचारी वर्गाला ५ हजार रुपये दिवाळी भेट देण्यात येणार आहे.

Ajit Pawar : राज्यातील विविध प्रश्नासंबंधी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Exit mobile version