spot_img
Saturday, September 21, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

मुंबईकरांचा प्रवास सुखकर होणार, रस्त्यावर धावणार डबल डेकर इलेक्ट्रिक बस

मुंबईत डबल डेकर बेस्ट बसचा फार जुना इतिहास आहे. ब्रिटीश काळापासून प्रवाश्यांना सेवा देत आलेली डबल डेकर कालांतराने नाहीशी होत गेली. पण आता मुंबईतील प्रवाश्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे डबल डेकर बस मध्ये काळाप्रमाणे बदल झाले आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहिती नुसार डबल डेकर हि इलेक्ट्रिक बस रुपात पाहायला मिळणार आहे. ही भारतातील पहिली डबल डेकर इलेक्ट्रिक बस असेल. 18 ऑगस्ट रोजी उद्घाटन कार्यक्रमापूर्वी या बसची झलक रस्त्यावत धावताना दिसली. या बसची सेवा सामान्य नागरिकांसाठी सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. गुरुवारी म्हणजेच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या नवीन बसचे उद्घाटन होणार आहे.

विधीमंडळाचं पावसाळी अधिवेश ईडी सरकार हाय हाय विरोधकांकडून घोषणाबाजी

या नव्या कोऱ्या डबल डेकर इलेक्ट्रिक बसचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायराल होत आहे. या व्हिडीओमध्ये हायवेवर इलेक्ट्रिक डबल डेकर बस दिसत आहे. यापूर्वी सर्व आवश्यक परवानग्या घेऊन इलेक्ट्रिक डबल डेकर बस बेस्टची तपासणी देखील झाली आहे. बेस्टकडे सध्या 400 हून अधिक सिंगल-डेकर इलेक्ट्रिक बसेस आहेत. याशिवाय टप्प्याटप्प्याने 900 इलेक्ट्रिक बसेसची मागणीही त्यांनी केली आहे. त्यापैकी 50 टक्के पुरवठा मार्च 2023 पर्यंत केला जाणार आहे.

लोकल ट्रेन प्रमाणे मुंबईकरांसाठी बेस्ट बस देखील महत्वाची आहे. आणि आता बेस्टच्या डिजिटलीकरणात आता नव्या इलेक्ट्रीक एसी डबल डेकर दाखल होणार आहेत. विविध सेवांचे लोकार्पण बेस्टच्या महापालिकाकरणास 75 वर्षे तसेच स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नरिमन पॉईंट येथील टाटा थिएटर येथे आज संध्याकाळी 6.30 वा. बेस्टची प्रिमियम सेवा, दुमजली वातानुकूलित बस, बेस्टची स्वयंचलित मार्गप्रकाश व्यवस्थापन प्रणालींचे उद्घाटन मान्यवरांचे हस्ते होईल. बेस्ट उपक्रमाची अमृत महोत्सवी कथा पुस्तकाचे प्रकाशन, कॉफी टेबल बुकचे प्रकाशन यावेळी होईल.

हेही वाचा : 

रश्मी शुक्ला आणि फडणवीस यांच्या भेटीवर काँग्रेसचे टीकास्त्र

Latest Posts

Don't Miss