spot_img
Tuesday, September 17, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

आताच स्टॉक भरून ठेवा, राज्यात तीन दिवस Dry Day!

सध्या देशभरात निवडणुकीची धामधूम (Loksabha Election 2024)सुरु आहे. निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला असून अजून तीन टप्पे पार पडणे बाकी आहेत.

सध्या देशभरात निवडणुकीची धामधूम (Loksabha Election 2024) सुरु आहे. निवडणुकीचा चौथा टप्पा पार पडला असून अजून तीन टप्पे पार पडणे बाकी आहेत. त्यातच मद्यप्रेमींसाठी एक वाईट बातमी बाहेर येत आहे. महाराष्ट्रात (Maharashtra)या आठवड्याच्या अखेरीस ३ दिवस दारूची दुकान बंद राहणार असून ३ दिवस ड्राय डे (Dry Day)असेल. या शनिवारपासून पुढील सोमवारपर्यंत दुकाने बंद राहतील.

२० मे रोजी निवडणुकीचा पाचवा टप्पा पार पडणार असल्याने १८ मे ते २० मे पर्यंत ड्राय डे ची घोषणा करण्यात आली आहे. मुंबई (Mumbai) शहरामध्ये १८ मे संध्याकाळी ५ वाजल्यापासून दारूची दुकाने आणि बार बंद राहतील. १९ मे रोजी संपूर्ण दिवसभर दुकाने बंद राहतील तर २० मे ला संध्याकाळी ५नंतर उघडतील. याशिवाय ५ जूनही ड्राय डे असल्याचं घोषित करण्यात आलं आहे. एरव्ही संपूर्ण देशभरात होळी, दिवाळी, गांधी जयंती, १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी रोजी ड्राय डे असतो. या दिवशी कुठल्याही प्रकारची दारूविक्री करता येत नाही.

उत्पादन शुल्काच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान ठाणे (Thane)परिसरात ९०४.६५ लाख बालक लिटर बिअरची विक्री करण्यात आली होती. याउलट २०२३ मध्ये एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान ९८८.३२ लाख बालक लिटर दारूची विक्री झाल्याचे समजते. या महिन्यात तीन दिवस जरी ड्राय डे असला तरी मद्यप्रेमींना मात्र पाण्यानेच घसा ओला ठेवावा लागणार आहे.

हे ही वाचा:

Latest Posts

Don't Miss