राज्यात मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सांगली जिल्याच्या पश्चिम भागांमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.

राज्यात मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा

सांगली जिल्याच्या पश्चिम भागांमध्ये पावसाची संततधार सुरूच आहे. तर काही भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. कालच्या मुसळधार पावसामुळे कामधंद्याच्या लोकांचे चांगलेच हाल झाले होते त्याचबरोबर लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. कृष्णा आणि वारणा या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे. चांदोली धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून चांदोली धरण (Chandoli Dam) परिसरात २४ तासांत ६७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सांगलीतील (Sangli) यंदाची ही पहिलीच अतिवृष्टी आहे आणि यामुळे वारणा नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरु असल्यामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. दुसरीकडे सांगलीजवळील कृष्णा नदीमधील पाणी पातळी देखील आता वाढू लागली आहे. अद्याप कोयना धरणातून नदीमध्ये विसर्ग सुरु न केल्याने संथ गतीने पाणी वाढत आहे. शिराळा तालुक्यातून जाणाऱ्या वारणा नदीची पाणीपातळी वाढून कोकरुड येथील बंधारा पाण्याखाली गेला. वारणा नदीच्या पाणलोट क्षेत्रासह वाहतूक ठप्प झाली आहे. शाहूवाडी परिसरात सोमवारी रात्रीपासून तालुक्याच्या पश्चिम भागातील संततधार पाऊस सुरु आहे. सकाळपासून जोर वाढल्याने कोकरुडला येण्यासाठी ओढे, तुरुकवाडीमार्गे पाच-सहा किलोमीटर दूरचा प्रवास करावा लागत आहे.

सलग दोन दिवस सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. यामध्ये रायगड (Raigad Rain) आणि पुण्यातील घाट माथ्यासाठी रेड अलर्ट जारी केला असून पालघर (Palghar), सातारा (Satara), पुणे (Pune) आणि रायगड (Raigad) जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये महाबळेश्वर (Mahabaleshwar Rain), दापोली (Dapoli), चिपळूण (Chiplun) यांसारख्या भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे डोंगराळ भागामध्ये दरड कोसळण्याची भीती असल्यामुळे प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हे ही वाचा:

Mumbai Local मधून प्रवास करणाऱ्यां ज्येष्ठांसाठी खूशखबर, आता…

लोकप्रिय अभिनेत्री आणि मॉडेल Gigi Hadid ला अटक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version