मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वे मार्गावरील लोकल सेवा तब्बल २० ते २५ मिनिटं उशिराने सुरु आहे. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरुन प्रवास करणाऱ्या लोकल प्रवाशांचा खोळंबा झालाय. अप आणि डाऊन फास्ट लाईनवरील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाला आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावरील जलद लोकल रखडल्या आहेत. सकाळीच हा बिघाड झाल्याने कामावर जाणाऱ्या नेहमीच्या ठरलेल्या वेळेऐवजी लोकल सेवा उशिराने सुरु असल्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागलंय.
हेही वाचा :
Sanjay Raut Bail : संजय राऊतांच्या जामिनावर आज निर्णय, ठाकरेंची तोफ तुरुंगाबाहेर येणार का?