Raigad Pen : पेणजवळ आढळला डमी बॉम्ब, ४ तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी

Raigad Pen : पेणजवळ आढळला डमी बॉम्ब, ४ तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी

मुंबई – गोवा हायवेवरील पेण येथे संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झालं आहे. सुमारे चार तासांच्या प्रयत्नानंतर संशयास्पद बॉम्ब निकामी करण्यात आला. गुरुवारी (१०नोव्हेंबर) सायंकाळच्या सुमारास जिलेटन सदृश्य वस्तू सापडल्या होत्या. दरम्यान, नवी मुंबई आणि रायगडच्या बॉम्ब शोधक पथकाच्या मदतीनं हा बॉम्ब निकामी करण्यात यश मिळालं आहे.

हेही वाचा : 

आरोग्यासाठी ओवा खाण्याचे फायदे जाणून घ्या…

रायगड आणि नवी मुंबई बॉम्ब शोध पथकाने ही वस्तू तपासली. त्यानंतर लक्षात आलं, की हे डमी बॉम्ब आहेत. यात वायर, पाईप आणि घड्याळ आहे. यात धोकादायक असं काहीच आढळलं नाही. संध्याकाळी झालेलं हे सर्च ऑपरेशन मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास संपलं. मात्र सकाळी पुन्हा एकदा या संपूर्ण परिसराची खबरदारी म्हणून पाहणी करण्यात येणार आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी दिली.

नदीमध्ये जिलेटन कांड्या सापडल्याचं समजताच पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांच्यासह पोलीस अप्पर पोलीस अधिक्षक अतुल झेंडे, प्रांत विठ्ठल इनामदार,तहसिलदार प्रसाद कालेकर यांनी ताततीने घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. शिवाय पेण तालुक्यातील तिन्ही पोलीस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी यांनाही तातडीने घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. या जिलेटन कांड्या नदीपात्रातून बाहेर काढण्यासाठी बॉम्ब शोधक पथकासही पाचारण करण्यात आले होते. अखेर संशयास्पद आढळून आलेली वस्तू ही डमी बॉम्ब असल्याचे निष्पन्न झालं आहे. या बॉम्ब सदृश्य वस्तूमध्ये वायर आणि घड्याळाचा वापर करण्यात आल्याचे उघड झाले.

घरच्या घरी कसे बनवायचा रेड सॉस पास्ता

Exit mobile version