spot_img
Thursday, September 19, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

डिसले गुरुजी यांच्यावर आरोप करणारे शिक्षणाधिकारी किरण लोहार अडचणीत; २५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ सापडले

सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर अखेर कारवाईचा हातोडा पडला आहे.सोलापूर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २५ हजार रुपये घेताना रंगेहात पकडले असल्याची माहिती समोर आली आहे. किरण लोहार यांच्या सोबतच चैतन्य भागातील एका लिपिकास यावेळी पकडण्यात आले आहे. ५० हजार रुपयांची लाच मागितली होती,तडजोडी अंती २५ हजार रुपये ठरले होते, अशी माहिती समोर आली आहे.

याच किरण लोहार यांनी डिसले गुरुजींवर काही आरोप केले होते. त्यानंतर डिसले गुरुजींनी राजीनामा देण्याची भूमिका घेतली होती. शिक्षणाधिकारी किरण लोहार हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील आहेत. कामकाजाच्या प्रत्येक ठिकाणी वादग्रस्त अधिकारी म्हणून लोहार यांच्यावर शिक्का मारण्यात आला. कोल्हापूरमधील लोहार यांची कारकीर्द तर चांगलीच गाजली होती. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या सभागृहातच किरण लोहार यांच्यावर पैसे घेतल्याचे आरोप सदस्यांनी केले. शिवाय अनेक गंभीर तक्रारीवरूनच त्यांना जिल्हा परिषदेमधून एकतर्फी कार्यमुक्त केले. मात्र पुढे ते मॅटमध्ये गेले. लोहार यांच्या मुद्द्यावरून संपूर्ण सभागृह एकदा बंद पडले होते.

रणजित डिसले गुरुजींवर कारवाई करणारे सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार यांना ते जेव्हा कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी म्हणून काम करत होते तेव्हा कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून ऑनररी पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली होती . पण ज्या संस्थेकडून ही पदवी देण्यात आली ती कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा ही संस्थाच मुळात बोगस असल्याचं शिक्षण संचालकांच्या चौकशीत उघड झालं होत . त्यांनतर या संस्थेच्या विरुद्ध शिक्षण संचालकांच्या तक्रारीनंतर पुण्यातील वानवडी पोलीस स्टेशनमध्ये २०१९ मध्ये गुन्हाही नोंद करण्यात आला होता , त्याचबरोबर टोंगा या देशानेही त्यांच्याकडे अशा नावाचे कोणतंही विद्यापीठ नसल्याचं स्पष्टीकरण दिलं होतं.

हे ही वाचा :

चक्क ८ किलोचा बाहुबली समोसा बघितला का कधी?, खाल्ल्यास मिळणार ५१ हजारांचं बक्षीस

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा; शिखर धवन कडे वनडेचे नेतृत्व

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss