मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर, करंजवण पाणी प्रकल्पाचे भूमीपूजन

महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज दि. १३ फेब्रुवारी रोजी नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर, करंजवण पाणी प्रकल्पाचे भूमीपूजन

महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे आज दि. १३ फेब्रुवारी रोजी नाशिक (Nashik) दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथील कार्यक्रमांना मुख्यमंत्री उपस्थिती दर्शवणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून करंजवण-मनमाड पाणी पुरवठा योजनेची चर्चा ही सुरु होती. याचाच भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्र्याच्या हस्ते पार पडणार आहे.

मात्र गेल्या अनेक वर्षापासून या शहरातील नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार सुहास कांदे यांनी तेथील नागरिकांना आश्वासन हे दिले होते. तुम्ही मला निवडून द्याल मी पाणीप्रश्न हमखास मार्गी लावेल, असे ते आश्वासन दिले होते. जनतेने त्यांना निवडून दिल्यानंतर त्यांनी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या करंजवण पाणी पुरवठा योजनेचा पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून या योजनेला शासनाने केवळ हिरवा कंदीलचं दिला नाही, तर त्यासाठी निधींची तरतूद देखील केली आहे. सुहास कांदे हे नांदगाव मतदारसंघातील आमदार आहेत. त्याचसोबत ते शिंदे गटात जाणारे पहिले नेते आहेत. मनमाड शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावणाऱ्या तब्बल ३११ कोटीच्या करंजवण पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन आज सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत आहे.

आज दि १३ फेब्रुवारी रोजी मुख्यमनातरी एकनाथ शिंदे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक जिल्ह्याती; मनमाड येथे एकनाथ शिंदे हे जाणार आहेत. येथे महत्त्वाच्या पाणी प्रकल्पाच्या योजनेच्या भूमीपूजन सोहळा पार पडणार आहे. यासाठी उद्योगमंत्री उदय सावंत, पालकमंत्री दादा भुसे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. शहरातील भगवान ऋषीं वाल्मिकी स्टेडियमवर होणार्‍या या कार्यक्रमासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

हे ही वाचा : 

कोश्यारींच्या पापाची फळे भाजपला भोगावी लागतील, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची खरमरीत टिका

पुण्यातील कोकणवासियांसाठी खुशखबर, होळीनिमित्त पुण्यातून सोडणार जादा बसेस

‘Bigg Boss 16’चा विजेता MC Stan नक्की कोण आहे?

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version