पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्यान’चं उद्घाटन रद्द, स्वयंसेवी संस्थांचा हस्तक्षेप

पुण्यातील ‘एकनाथ शिंदे उद्यान’चं उद्घाटन रद्द, स्वयंसेवी संस्थांचा हस्तक्षेप

पुण्यातील 'एकनाथ शिंदे उद्यान'चं उद्घाटन रद्द

पुणे : राज्याचे मुखमंत्री सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज मुख्यमंत्र्यांचा मुक्काम हा पुणे शहरात आहे. पुण्यातील सासवड येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव असलेल्या उद्यानाचे उद्घाटनाच कार्यकम रद्द करण्यात आला आहे. आज मुख्यमंत्री शिंदे या उद्घाटन कार्यक्रमासाठी हजेरी लावणार होते. मात्र हे नामकरण नियमबाह्य असल्याची तक्रार पुण्यातील स्वयंसेवी संघटनांनी केली आहे. महापालिकेच्या उद्यानाला नगरसेवकांच्या कुटुंबीयांची नावे देण्यात येऊ नयेत. राष्ट्रीय नेते, वनस्पती शास्त्रज्ञ आणि पर्यावरण शास्त्रज्ञांची नावेच उद्यानाला द्यावीत, असा महापालिकेच्या मुख्य सभेचा ठराव असतानाही तो डावलून या उद्घाटनाची तयारी सुरु होती.

हडपसर परिसरात महापालिकेच्या जागेवर हे उद्यान उभारण्यात आले आहे. शिवसेनेचे शिंदे समर्थक माजी नगरसेवक प्रमोद नाना भानगिरे यांनी या उद्यानाला एकनाथ शिंदे यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र संघटनांच्या आक्षेपानंतर अखेर हा उद्घाटन कार्यक्रमच रद्द करण्यात आला आहे. तसेच उद्यानाच्या नावाचा बोर्डदेखील आता झाकण्यात आला आहे.

हेही वाचा : 

‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटावर बहिष्काराची मागणी असताना, करीना कपूर म्हणाली…

याच परिसरात उभारण्यात आलेल्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे फुटबॉल मैदानाचे उद्घाटनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते परंतु महापालिका प्रशासनाला कोणतीही कल्पना न देता हा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. तसंच कोणताही नियमांचे पाळला केले नसल्याने फुटबॉल मैदानाचे उद्घाटनही रद्द कऱण्यात आले आहे.

‘लाल सिंग चड्ढा’ या चित्रपटावर बहिष्काराची मागणी असताना, करीना कपूर म्हणाली…

Exit mobile version