राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

राज्यातील 17 जिल्ह्यातील, 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला.

राज्यातील 92 नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर; ‘या’ दिवशी होणार मतदान

मुंबई : राज्यातील 17 जिल्ह्यातील, 92 नगरपालिका व चार नगरपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहिर केला. 18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून या निवडणुकीची प्रक्रीया 20 जुलैपासून सुरु होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार 20 जून रोजी जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहिर करणार असून लगेच 22 ते 28 जुलैपर्यंत राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरायची आहेत. उमेदवारी मागे घेण्यासाठीच्या शेवटच्या दिवसानंतरच्या लगतच्या दिवशी अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे.

हेही वाचा : 

केंद्र सरकारकडून नागरिकांना दिलासा, खाद्यतेलाच्या किंमतीत 15 रुपयांनी घसरण

18 ऑगस्ट रोजी मतदान होणार असून 19 ऑगस्टला मतमोजणी होणार आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, क्लाहूपर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या 17 जिल्ह्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार आहे.

अभिनेत्री अमृता पवार चे लग्नसोहळातील फोटो!

Exit mobile version