spot_img
Sunday, September 8, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

नाशिक दौऱ्यादरम्यान साल्हेर किल्ल्यावर मनोज जरांगेंसोबत घातपात

मराठा आंदोलक मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने आले होते.

मराठा आंदोलक मनोज जरांगे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईच्या दिशेने आले होते. त्यांच्यासोबत लाखो मराठा आंदोलक मुंबईमध्ये आले होते. मुंबईमध्ये आल्यानंतर सरकारकडून अध्यादेश देण्यात आला होता. त्यानंतर मनोज जरांगे नाशिक दौऱ्यावर असताना त्यांच्यासोबत घातपात झाल्याचे त्यांनी सांगितले आहे. जरांगे नाशिकमध्ये साल्हेर किल्यावर घातपाताचा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच आपल्या जीवलाही धोका असू शकतो, पण आम्ही घाबरत नाही. तसेच अशा घटनांची भुजबळांप्रमाणे कुठेही वाच्यता करत नाही, असे देखील मनोज जरांगे म्हणाले.

मराठा आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या अध्यादेशावर अंमलबजावणी न झाल्याने मनोज जरांगे आजपासून पुन्हा एकदा आंदोलनासाठी बसले आहेत. त्यांचे आंतरवली सराटीमध्ये चौथे आंदोलन आहे. या आंदोलनाविषयी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आता करण्यात आलेले उपोषण कठोर असणार आहे. या काळामध्ये ना पाणी घेणार, ना उपचार घेणार अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे. सरकारने मनोज जरांगे यांना दिलेल्या आध्यदेशाचे लवकरात लवकर कायद्यामध्ये रूपांतर व्हावे, यासाठी मनोज जरांगे हे पुन्हा एकदा उपोषण करणार आहेत. यावेळी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, एका व्यक्तीने अंगावर गाडी घालून, अपघात झाल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर वाहनचालकाला ताब्यात घेण्यात आले. याबाबत आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ओएसडीला माहिती दिली आहे.

नाशिकमध्ये झालेल्या घातपाता विषयी बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आम्हाला भीती असून सुद्धा आम्ही कोणाला काही सांगत नाही. आमच्यासोबत ७ वेळा अश्या सर्व घटना घडल्या आहेत. मात्र, या घटनांबाबत आम्ही कोणाला काही सांगितलं नाही. नाशिकमधील साल्हेर किल्ल्यावर जाताना आमच्या अंगावर टेम्पो आला होता, पण आम्ही कधी सरंक्षणाची मागणी केली असती. आमच्या सोबत घातपात घडल्याने आम्ही कोणाला काही सांगितले नाही. आम्ही नाशिकमधील साल्हेर किल्ल्यावर गेलो होतो. त्यावेळीस सर्व गाड्या खाली लावल्या होत्या. मात्र वरती अचानक एक पिकअप वरतून खाली आला. हे त्यावेळेस माझ्या लक्षात नाही आला. पण ज्यावेळेस आम्ही दर्शन करण्यासाठी गेलो तेव्हा तिथे पोलीस आले आणि लवकर चला असे बोलू लागले. पण त्यावेळी नेमकं काय घडलं हे कोणाला कळू दिलं नाही. गाडीचा ब्रेक खराब झाल्याने गाडी वरतून खाली आली. वेगाने जर गाडी खाली आली असती तर आमचा भुगा झाला असता. पण जोरात आवाज दिल्याने सगळे बाजूला झाले. त्यानंतर पोलिसांनी वाहनचालकाला पकडले. हा संपूर्ण प्रकार खरा आहे की खोटा हा माहित नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.

Latest Posts

Don't Miss